Ashok Ma. Ma SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ashok Ma. Ma : नात्यातील दुरावा संपला; अशोक मामा अन् त्यांच्या बहिणीची भेट, पाहा VIDEO

Ashok MaMa Serial Update : 'अशोक मा.मा.' मालिकेत मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. अशोक मामांची त्यांच्या बहिणीसोबत भेट होणार आहे.

Shreya Maskar

'अशोक मा.मा.' मालिकेत नवीन वळण पाहायला मिळत आहे.

अशोक मामा आणि त्यांच्या बहिणीची भेट होणार आहे.

बहिण भावाच्या नात्यातील दुरावा कमी होणार की वाढणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कलर्स मराठीवरील 'अशोक मा.मा.' (Ashok Ma. Ma) मालिकेत आता नवीन वळण आले आहे. मालिकेत तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. गणपती विसर्जनानंतर सुरू झालेला नीलिमाच्या शोधाचा प्रवास आता एका नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. घरातील सर्वांच्या मदतीने नीलिमाच्या घराचा पत्ता सापडतो.

नीलिमा ही अशोक मामांची बहीण आहे. त्यामुळे पत्ता मिळताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो. परंतु जेव्हा अशोक मा.मा. नीलिमाला भेटायला जातात तेव्हा तिचे थंड, कठोर वागणे पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. सख्खा भाऊ असूनही नीलिमा मामांच्या डोळ्यात न पाहता दार बंद करते. तिच्या आयुष्यात नक्की काय घडतंय, ती इतकी कशी बदलली? हे कोडे येणाऱ्या भागांमध्ये उलघडताना दिसणार आहे.

अशोक मामांना काही लोकांकडून नीलिमाच्या बिकट परिस्थितीबद्दल माहिती मिळते. घरात उभ्या असलेल्या संकटांमध्ये आता भैरवीचा नवरा अनिशच्या वागण्यामुळे आणखी गोंधळ वाढतो. लोक अशोक मामांच्या घरी पैसे वसूल करण्यासाठी येतात. एका बाजूला नीलिमाच्या मनातील गुपित आणि नात्यांचा ताण, तर दुसरीकडे भैरवी-अनिशमधील वाढत चाललेली दरी 'अशोक मा.मा.' हे सर्व कस नीट करणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

'अशोक मा.मा.' मालिकेला आता अधिकच रंजक वळण आले आहे. प्रत्येक एपिसोड महत्त्वाचा असणार आहे. नात्यांची ही गुंतागुंत अशोक मामा कशी सोडवणार हे येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. 'अशोक मा.मा.' मालिका कलर्स मराठी वाहिनीवर रात्री 8.30 वाजता पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gen Z Leads Protests: तरुण पिढीनं सरकारविरोधात आंदोलन का केलं? नेपाळमधील असंतोष का वाढला?

Maharashtra Live News Update : कुणबी - मराठा म्हणून आरक्षण घेण्यास मराठा क्रांती मोर्चाचा विरोध

ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? आमदार-नगरसेवक संपर्कात, शिंदेंच्या नेत्याचा दावा

Farm Benefits For Wife : पती-पत्नीच्या नावे शेती असल्यास, आता फक्त पत्नीलाच मिळणार लाभ | VIDEO

Devendra Fadnavis : 'नवीन नागपूर'ला ११००० कोटींचा बूस्टर डोस, एनएमआरडीए आणि हुडको यांच्यात करार

SCROLL FOR NEXT