Aamir Khan : आमिर खानला म्हटलं जातंय 'वाह उस्ताद', मिस्टर परफेक्शनिस्टचा VIDEO व्हायरल

Aamir Khan Viral Video : आमिर खानच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून त्याच्या गाण्याचे कौतुक होत आहे.
Aamir Khan Viral Video
Aamir Khan SAAM TV
Published On
Summary

आमिर खानच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आमिरने इतर कलाकारांसोबत मिळून 'राग' गायला आहे.

बॉलिवूडमध्ये आमिर खानला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाते.

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) कायम त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहीला आहे. त्याने आजवर आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. मात्र आता आमिर खानचे हिडन टॅलेंट जगासमोर आले आहे. अभिनयासोबतच आमिर खान एक उत्तम गायक देखील आहे. त्याच्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये आमिर खान 'राग' गाताना दिसत आहे. आमिर खान एका कार्यक्रमात दुसऱ्या कलाकारासोबत गाताना दिसत आहे. स्टेजवरचा त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आमिर खानच्या गाण्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. नेटकरी देखील व्हिडीओवर कमेंट्चा वर्षाव करत आहेत. आमिर खानचा आवाज पुन्हा एकदा ऐकून चाहते खुश झाले आहेत. आमिर खानने गायलेले 'आती क्या खंडाळा' हे गाणे आजही खूप प्रसिद्ध आहे. 1998 साली रिलीज झालेल्या 'गुलाम' चित्रपटातील हे गाणे आहे. आमिर खानला नेटकऱ्यांकडून 'वाह उस्ताद' म्हटले जात आहे.

वर्कफ्रंट

आमिर खान अलिकडेच 'सितारे जमीन पर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात आमिरसोबत जिनिलीया देशमुख झळकली आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील बंपर कमाई केली आहे. त्यानंतर आमिर खान रजनीकांत यांच्या 'कुली' चित्रपटात दिसला. या चित्रपटात त्याचा खास अंदाज पाहायला मिळाला. 'लाहौर 1947' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याच्या सोबत सनी देओल झळकला आहे. चाहते आमिरच्या आगामी चित्रपटांसाठी खूप उत्सुक आहेत.

आमिर खान बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. अलिकडेच आमिर खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला होता. आमिर खानच्या भाऊ फैसल खानने त्याच्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. आमिर खानची लव्ह लाइफ कायम चर्चेचा विषय राहीली आहे.

Aamir Khan Viral Video
Navya Nair : लोकप्रिय अभिनेत्रीला केसात गजरा माळणे पडलं महागात, भरावा लागला तब्बल 1 लाखाचा दंड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com