प्रसिद्ध अभिनेत्रीला फुलांच्या गजऱ्यामुळे लाख रुपयांचा दंड भरावा लागला.
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विमानतळावर नव्या नायरसोबत ही घटना घडली.
ऑस्ट्रेलियातील नियमांचे नकळत अभिनेत्रीने उल्लंघन केले.
सणासुदी म्हटले की, महिलांचा साज श्रृंगार आला. महिलांच्या सौंदर्याला केसात माळलेला गजरा चारचाँद लावते. मात्र याच गजऱ्यामुळे एका लोकप्रिय अभिनेत्री अडचणीत आली. तिला लाख रुपयांमध्ये दंड भरावा लागला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात. मल्याळम अभिनेत्री नव्या नायरला (Navya Nair) केसात गजरा माळल्यामुळे 1 लाखाचा दंड भरावा लागला आहे.
नुकतीच नव्या नायर ऑस्ट्रेलियाला गेली होती. नव्या ओणमच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेली होती. तेव्हा नव्याने सुंदर पारंपरिक लूक केला होता. तिने केसात चमेलीच्या फुलांचा गजरा माळला होता. तिच्या केसातील गरजा 15 सेंटीमीटर एवढा मोठा होता. ऑस्ट्रेलियाचे फुले आणि वनस्पतींबाबत काही कडक नियम आहेत. ज्यामुळे अभिनेत्रीला दंड भरावा लागला.
अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या वडिलांनी तिच्यासाठी चमेलीचे दोन गजरे आणले होते. त्यातील एक गजरा अभिनेत्रीने कोचीहून सिंगापूरला जाताना केसात माळला आणि दुसरा बॅगमध्ये ठेवून दिला. जेणेकरून ती सिंगापूरहून पुढील प्रवासात तो गजरा माळेल. गजरा कोमेजू नये म्हणून अभिनेत्रीच्या वडिलांनी तिला तो माळण्यास सांगितले. मात्र या सर्वामुळे नकळत अभिनेत्रीच्या हातून कायद्याचे उल्लंघन झाले. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विमानतळावर नव्या नायरला चमेलीची फुले नेल्याबद्दल 1.14 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
नव्या नायरने 15 सेंटीमीटर चमेलीचा गजरा आणल्यामुळे तिला 1,980 ऑस्ट्रेलियन डॉलर प्रमाणे 1.14 लाख रुपयांचा दंड भरावा लागला. नव्या नायरने ऑस्ट्रेलिया ट्रिपचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या नियमांनुसार काही फुले, वनस्पती त्यांची परवानगीशिवाय ऑस्ट्रेलियामध्ये घेऊन जाऊ शकत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.