Manasvi Choudhary
'बिग बॉस फेम' अंकिता वालावलकरने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
गणेशोत्सवानिमित्त अंकिताने खास पारंपारिक लूकमध्ये फोटोशूट क्लिक केलं आहे.
या लूकसाठी अंकिताने हिरव्या रंगाची खणाची चंद्रकला पैठणी साडी नेसली आहे.
साडीवर तिने कानात झुमके, कपाळी टिकली, केसात गजरा असा लूक केला आहे.
अंकिताने हातात हिरव्या बांगड्या घातल्या आहेत.
चंद्रकला पैठणीमध्ये अंकिता फारच सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर हास्य फुललं आहे.
फोटो शेअर केल्यानंतर अंकिताला नेटकऱ्यांकडून सुंदर अश्या प्रतिक्रिया येत आहे.
मराठी मुलगी, कोकण परी, खूप गोड दिसतेस.. नेटकऱ्याकडून अंकिताच्या सौंदर्याचं कौतुक केले जात आहे.
'माझी गौराई' असं अंकिताने तिच्या फोटो कॅप्शन दिलं आहे.