ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोल्हापूर हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात सुंदर जिल्ह्यापैंकी एक आहे. येथे भेट देण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणं आहेत.
पन्हाळा हिल स्टेशन इतके सुंदर आहे की लोकांना येथून घरी परत जावेसे वाटत नाही.
निसर्गाच्या सानिध्यात असलेले या ठिकाणी निवांत वेळ घालवू शकता. पिकनिकसाठी हे परफेक्ट ठिकाण आहे.
कोल्हापूरजवळ असलेले हे हिल स्टेशन केवळ पावसाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूत भेट देण्यासाठी परिपूर्ण आहे.
पन्हाळा हिल स्टेशनचे नैसर्गिक सौंदर्य येथे भेट देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला आकर्षित करते.
कोल्हापूरमधील या ऐतिहासिक किल्ल्याला भेट द्यायला विसरु नका. हा किल्ला १२ व्या शतकात बांधला गेला आहे.
कोल्हापूरपासून पन्हाळा हिल स्टेशनचे अंतर जास्त नाही. हे हिल स्टेशन सुमारे 21.5 किमी अंतरावर आहे.