ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अस्थमा एक गंभीर आजार आहे. चुकीच्या गोष्टींमुळे किंवा सवयींमुळे रुग्णांना जास्त त्रास होऊ शकतो.
जर तुम्ही अस्थमाच्या आजाराने त्रस्त असाल तर धुम्रपान, सिगारेट, तंबाखूचे सेवन करु नका. या गोष्टी अस्थमासाठी विषसमान आहेत.
अस्थमाच्या रुग्णांनी घराची साफ सफाई करताना मास्कचा वापर करावा. धूळीच्या कणामुळे अटॅक ट्रिगर होऊ शकतो.
तळलेले, मसालेदार आणि पॅकेज्ड फूड खाणं टाळा. यामुळे अस्थमा रुग्णांना आणखी त्रास होऊ शकतो.
अस्थमाच्या रुग्णांनी दररोज किंवा जास्त प्रमाणात व्यायाम करु नये. या रुग्णांनी जास्त प्रमाणात व्यायाम केल्या श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
अस्थमा असल्यास थंड पदार्थांचे सेवन करणे टाळा.अन्यथा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
डॉक्टरांना न विचारता अस्थमाची औषधे घेणं बंद करु नका. या औषधांचा कोर्स पूर्ण करा.