Veer Murarbaji Marathi Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Veer Murarbaji: रामायण मालिकेतील राम-सीतचे होणार पुन्हा दर्शन; 'वीर मुरारबाजी' चित्रपटात साकारणार 'या' खास भूमिका

Veer Murarbaji Marathi Movie: प्रत्येक मनामनांत ‘राम-सीता’ म्हणूनच विशेष जागा मिळवणारे कलाकार अभिनेते अरुण गोविल आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया आगामी 'वीर मुरारबाजी' चित्रपटात विशेष भूमिका साकारणार आहेत.

Shruti Vilas Kadam

Veer Murarbaji Marathi Movie: प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी प्रत्येक घराघरांत-मनामनांत ‘राम-सीता’ म्हणूनच विशेष जागा मिळवली आहे. या जोडीची अफाट लोकप्रियता आजतागायत कायम असून त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता येणार आहे. श्रीरामनवमीच्या निमित्ताने या दोघांचे एक आकर्षक पोस्टर प्रदर्शित झाले आहे.

वीर मुरारबाजी.. पुरंदरकी युद्धगाथा’ या महत्त्वाकांक्षी हिंदी चित्रपटात ही जोडी शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. भाऊसाहेब आरेकर यांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे तर दिग्दर्शन अजय-अनिरुद्ध यांनी केले आहे.

ऐतिहासिक चित्रपटात एकत्रित काम करण्याचा योग या निमित्ताने जुळून आला असून या भूमिकेसाठी आम्ही तितकेच उत्सुक होतो, असं हे दोघे सांगतात. शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांची भूमिका करायला मिळणं आमच्यासाठी खूपच आनंददायी होतं. ज्या उत्तुंग व्यक्तिमत्वांनी आपला प्रेरणादायी इतिहास घडवला, समाजाला नवा विचार दिला, अशी भूमिका साकारताना सोबत मोठी सामाजिक जबाबदारी नक्कीच असते, असं प्रांजळ मत या दोघांनी व्यक्त केलं.

पुरंदरच्या वेढ्याप्रसंगी झालेल्या धुमश्चक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडो गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ नरवीर मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रमी इतिहास आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा ‘वीर मुरारबाजी...पुरंदरकी युद्धगाथा’ या चित्रपटातून रुपेरी पडदयावर येण्यासाठी सज्ज होत असून लवकरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मालेगावच्या गिरणा नदी पत्रालागत एसिड सदृष्य रासायनिक ड्रम फेकले

Heavy Rain Alert : पावसाचा हाहाकार! लष्कर कॅम्पमधील २ शेल्टर गेले वाहून, ५ जवान बेपत्ता

Nagpur Police: पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या, पीसीएमटी क्वार्टर्समध्ये आढळला मृतदेह; पोलिस दलात खळबळ

Lassi Recipe Recipe: सणासुदीला घरच्या घरी झटपट बनवा पंजाबी टेस्टी लस्सी; वाचा सोपी रेसिपी

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं मंगळसूत्र पाहिलं का? नव्या डिझाइननं वेधलं सगळ्यांचं लक्ष | PHOTO व्हायरल

SCROLL FOR NEXT