Manoj Kumar: ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार अनंतात विलीन; शासकीय इतमामात अखेरचा निरोप

Manoj Kumar: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे काल निधन झाले. त्यांना आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Manoj Kumar
Manoj Kumar Saam Tv
Published On

Manoj Kumar: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे काल ४ एप्रिल रोजी पहाटे ३:३० वाजता निधन झाले. आज शनिवारी जुहू येथील पवनहंस स्मशानभूमीत त्यांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळून आणण्यात आले. 21 तोफांची सलामी देऊन त्यांचे शासकीय इतमामात सकाळी ११.३० च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या परिवारासह अमिताभ बच्चन, प्रेम चोप्रा आणि राजपाल यादव असे अनेक कलाकार त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी येथे पोहोचले.

कलाकारांनी दिला अंतिम निरोप

अभिनेते मनोज 'भरत' कुमार यांना राजकीय सन्मानात निरोप देण्यात आला. यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन, राजपाल यादव, लेखक सलीम खान, अरबाज खान, संगीतकार-गायक अनु मलिक, अभिनेता-निर्माता झायेद खान, अभिनेता प्रेम चोपड़ा, विंदू दारा सिंह, रजा मुराद, धर्मेंद्र, पूनम ढिल्लों शाहरुख खान जड अंत करणाने उपस्थित होते.

Manoj Kumar
Dhanashree Verma: युजवेंद्र चहलसोबत डिव्होर्सनंतर धनश्री वर्माचे नशीब चमकले; मिळाली सर्वात मोठ्या दोन टिव्ही शोची ऑफर!

पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनोज कुमार यांच्यासोबतच दोन फोटो शेअर करत शोक व्यक्त केला, त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर लिहिले, "ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमारजी यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले आहे. ते भारतीय चित्रपटसृष्टीचे एक आदर्श होते, त्यांना त्यांच्या देशभक्ती चित्रपटांसाठी ओळखले जाते. मनोज कुमारजींचा सिनेमातून हृदयात राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत करायचे. या दुःखाच्या वेळी मी त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत आहे. ओम शांती".

Manoj Kumar
Bajrangi Bhaijaan 2: 'सिकंदर'नंतर सलमान खान पुन्हा दिसणार बजरंगीच्या भूमिकेत; लवकरच येणार 'बजरंगी भाईजान 2'

महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "मनोज कुमारसारखे कलाकार आता शोधूनही सापडणार नाहीत. मी लहानपणापासून त्यांचा चाहता आहे. आमचे कौटुंबिक नाते आहे. आज मी राज्यमंत्री झालो असलो तरी मी येथे मंत्री म्हणून नाही, तर एक मित्र म्हणून आलो आहे. ते एक असे कलाकार होते ज्यांच्या हृदयात भारत होता. मी माझ्या कुटुंबाच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com