Money Mafia In Arun Gawali  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Arun Gawali: डॅडींची अमेझॉन, व्हॉईस मीडिया आणि डिस्कवरीला नोटीस; वाचा सविस्तर कारण

दगडी चाळीतील लोकांवर होणाऱ्या अन्यायाला पोलिसांच्या आधी न्याय देणारे दगडी चाळीतील रॉबिन हूड म्हणजे अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’. याच डॅडींनी डिस्कवरी प्लसवर प्रसारित होणाऱ्या मनी माफिया या मालिकेला नोटीस पाठवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Arun Gawali: मुंबईच्या इतिहासातील किंबहुना गँगवॉरच्या इतिहासातील एक महत्वाचे नाव, बाकीचे सगळे डॉन देशाबाहेर पळून गेले, मात्र ते मुंबईतच राहून आपल्या मराठी लोकांच्या पाठीशी उभा राहिलेले, चाळीच्या लोकांवर होणाऱ्या अन्यायाला पोलिसांच्या आधी न्याय देणारे दगडी चाळीचे रॉबिन हूड, म्हणजे अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’. याच डॅडींनी डिस्कवरी प्लस वर प्रसारित होणाऱ्या मनी माफिया या मालिकेला नोटीस पाठवली आहे.

या मालिकेत आपली बदनामी केल्याप्रकरणी अमेझॉन, व्हॉईस मीडिया आणि डिस्कवरीला नोटीस पाठवली आहे. त्यांचा नावाचा वापर करण्याआधी विचारण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान ॲमेझॉन, व्हॉईस मीडिया आणि डिस्कव्हरी या कंपनीने बिनशर्त माफी मागावी सोबतच अरुण गवळींचा उल्लेख काढून टाकावा अशी नोटीसीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी मनी माफिया ही मालिका डिस्कव्हरी प्लस या ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आली आहे. अरुण गवळी उर्फ डॅडी मुलाच्या लग्नासाठी पॅरोलवर तुरुंगाबाहेर पडले आहेत. डॅडींना मालिकेबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कायदेशीर रित्या त्या तीनही कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. ही नोटीस अरुण गवळींमार्फत वकील आशिष पाटणकर सोबतच प्रतीक राजोपाध्ये यांनी पाठवली आहे.

या मालिकेतील काही आक्षेपार्य संवाद होते. या संवादावर मालिकेतील नोटीसेतून आक्षेप व्यक्त करण्यात आला आहे. १७ नोव्हेंबरला मुंबईत अरुण गवळींच्या मुलाचे लग्न पार पडले. या कारणामुळे त्यांनी ४ दिवसाची रजा घेतली होती. डॅडींना पोलीस सुरक्षेसह मुंबईला न्यावे, अशी अट कारागृह प्रशासनाने घातली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

Maharashtra Politics : शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची भेट;महापालिकेची रणनिती ठरली? VIDEO

Astrology: 'या'५ राशींवर होणार धनवर्षाव, द्विद्वाद योगामुळे होतील मोठे फायदे

Fact Check: २१ हजार गुंतवा १५ लाख मिळवा? काय आहे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या व्हायरल व्हिडिओचे सत्य

IND Vs UAE : भारताने यूएईचा धुव्वा उडवला, सामना २७ चेंडूंमध्ये संपवला; टीम इंडियाची विजयी सुरुवात

SCROLL FOR NEXT