Dilip Kumar Birthday Special: दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये प्रेक्षकांना आन, देवदास, शक्ती सारखे चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. हा महोत्सव 20 शहरांतील 30 सिनेमागृहांमध्ये चालणार आहे.
फिल्म हेरिटेज फाऊंडेशनने दिलीप कुमार फिल्म फेस्टिव्हलची घोषणा केली आहे. दिलीप कुमार यांचा 100 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी या संस्थेने हा उपक्रम आहे. या महोत्सवात आन, देवदास आणि शक्ती हे लोकप्रिय चित्रपट देशभरातील निवडक सिनेमागृहांमध्ये दाखवले जाणार आहेत.
या महोत्सवाचे नाव दिलीप कुमार हिरोज हिरो असे असेल. 10 आणि 11 डिसेंबर रोजी हा महोत्सव होणार आहे. शिवेंद्रसिंह डुंगरपूर यांनी या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली आहे. फिल्म हेरिटेज फाऊंडेशनने या चित्रपट महोत्सवासाठी PVR सिनेमासोबत भागीदारी केली आहे. यामध्ये दिलीप कुमार यांचे लोकप्रिय चित्रपट दाखवले जाणार आहेत. (Film Festival)
या महोत्सवावर भाष्य करताना डुंगरपूर म्हणाले, “भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महान अभिनेत्याला मोठ्या पडद्यावर पुन्हा घेऊन येताना खूप आनंद होत आहे. ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. दिलीप कुमार अजूनही नायकांचे नायक आहेत. ते सर्वात मोठे स्टार आहेत. फिल्म हेरिटेज फाऊंडेशन त्यांच्या आयुष्यातील हा टप्पा याहून अधिक चांगला साजरा करू शकत नाही. त्यांचे काही चित्रपट 70 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाले होते आणि त्यांच्या दमदार अभिनयामुळे लोकांना आजही आवडतात." दिलीप कुमार यांचे जुलै २०२१ मध्ये वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले होते. (Actor)
शिवेंद्रसिंह डुंगरपूर यांनी यापूर्वी अमिताभ बच्चन यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले होते. दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी फिल्म हेरिटेज फाऊंडेशनच्या कार्यक्रमावर आनंद व्यक्त केला आहे. त्याचवेळी अमिताभ बच्चन यांनी चित्रपट रसिकांना दिलीप कुमार यांचे चित्रपट पडद्यावर पाहण्याची विनंती केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.