अरिजीत सिंगकडून गायकीतून निवृत्ती जाहीर
पार्श्वगायक म्हणून गाणे न गाण्याचा निर्णय अरिजीतने घेतलाय
अरिजीतने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना माहिती दिली
अरिजीतच्या निर्णयाने भारतीय संगीतसृष्टीला मोठा धक्का
भारतीय संगीतक्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीने कोट्यवधी चाहत्यांना धक्का बसला आहे. प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने गायकीतून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने सिनेमासाठी पार्श्वगायक म्हणून गाणे न गाण्याचा निर्णय घेतला आहे. अरिजीतने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली.
अरिजीत सिंग नव्या वर्षात नव्याने कोणत्याही सिनेमासाठी गाणे रेकॉर्ड करणार नाही. परंतु संगीत क्षेत्रात कायमचा दूर जात नसल्याचेही त्याने स्पष्ट केलंय. अरिजीत सिंगच्या निर्णयाने त्याच्या लाखो चाहत्यांना धक्का बसला आहे. अरिजीतने सशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना महत्वाची माहिती दिली.
अरिजीत सिंगने स्पष्ट केलं आहे की, 'सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा. तुम्ही इतके वर्ष श्रोते म्हणून प्रेम केलं, त्याविषयी तुमचे खूप खूप आभार. मला घोषणा करताना आनंद होत आहे की, मी आता कोणतंही नवीन गाणं गाणार नाहीये. कारण मी आता थांबतोय. आतापर्यंतचा हा प्रवास खूप चांगला होता'.
पार्श्वगायक अरिजीत सिंग याने संगीतविश्वाला रामराम ठोकल्याने मनोरंजनसृष्टीत एकच खळबळ उडाली. अरिजीतने सोशल मीडियावरून ही माहिती दिल्यानंतर अनेक जण चकीत झाले.
अरिजीत सिंगने पुढे म्हटलं की, 'मी एक लहान कलाकार आहे. भविष्यात संगीत आणखी जवळून शिकायचं आहे. स्वत:चे प्रोजेक्ट आणि स्वंतत्र्यरित्या म्युझिकवर काम सुरू ठेवणार आहे'.
'काही प्रोजेक्ट्सवर काम सुरू आहे. हाती घेतलेले काम पूर्ण करणार आहे. त्यामुळे चाहत्यांना वर्षभर माझे गाणे ऐकण्याची संधी आहे. काही गाणे आधीच रेकॉर्ड झाले आहेत. तर काही गाण्यांवर काम सुरू आहे, असेही त्याने सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.