Arbaaz Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Arbaaz Khan: ५८ व्या वर्षी अरबाज खान दुसऱ्यांदा झाला बाबा, शूराने दिला गोंडस मुलीला जन्म

Arbaaz Khan and Shoora Khan Welcome Baby Girl: बॉलिवूड अभिनेता अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाला. अरबाज खानची बायको शूराने गोंडस मुलीला जन्म दिला. सोशल मीडियावर दोघांचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Priya More

Summary -

  • अरबाज खान ५८ व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला.

  • शूरा खानने मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये गोंडस मुलीला जन्म दिला.

  • दोघांवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • खान कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. सलमान खानचा भाऊ अभिनेता अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. अरबाजची बायको शूरा खानने गोंडस मुलीला जन्म दिला. कन्यारत्न झाल्यामुळे शूरा आणि अरबाजसह संपूर्ण खान कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये शूरा खान शनिवारी डिलिव्हरीसाठी दाखल झाली होती. हॉस्पिटलच्या बाहेर दिसल्यापासून शूरा खान लवकरच गुड न्यूज देईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. ५ ऑक्टोबरला म्हणजे आज शूरा खानने मुलीला जन्म दिला. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच अरबाज आणि शूराचे चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

अरबाज खानने याचवर्षी जून महिन्यामध्ये शूराच्या प्रग्नेंसीची माहिती दिली होती. नुकताच शूराचा बेबी शॉवर कार्यक्रम देखील पार पडला होता. या कार्यक्रमाला सलमानसह संपूर्ण खान कुटुंबीय एकत्र आले होते. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली. या कार्यक्रमातील अनेक फोटो देखील व्हायरल झाले होते.

अरबाज खानने २०१९ मध्ये मलायका अरोराला घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर एका चित्रपटाच्या सेटवर अरबाजची भेट शूरासोबत झाली. दोघांमध्ये आधी मैत्रीनंतर प्रेम झाले. त्यांनी २४ डिसेंबर २०२३ मध्ये लग्न केले. लग्नापूर्वी अरबाजने दोन वर्षे शूराला डेट केले. शूरा मेकअप आर्टिस्ट आहे. लग्नानंतर २ वर्षांनी अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. अरबाजला एक्स वाइफ मलायका अरोराकडून अरहान हा मुलगा आहे. आता २५ वर्षांनंतर तो दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. खान कुटुंबामध्ये गोंडस परीचे आगमन झाल्यामुळे सर्वजण आनंदी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Tourism : कास पठाराजवळ लपलाय निसर्गाचा अद्भुत नजारा, थंडीत येथे आवर्जून जा

Crime News: बायकोसोबत अवैध संबंधाचा संशय, नवऱ्याने केली तरुणाची गळा चिरून हत्या

Rain Alert : तुळशीच्या लग्नाला पावसाची हजेरी, या जिल्ह्यांत कोसळधारेचा इशारा, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Live News Update: कार्तिकीच्या निमित्ताने चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी

HBD Shah Rukh Khan : परदेशात बंगले अन् लग्जरी कार; बॉलिवूडचा 'किंग' कोट्यावधींचा मालक, संपत्तीचा आकडा वाचून डोळे विस्फारतील

SCROLL FOR NEXT