AR Rahman Saam Tv
मनोरंजन बातम्या

A.R Rahman: एआर रहमानला मोठा धक्का, कोर्टाने ठोठावला २ कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?

AR Rahman News: दिल्ली उच्च न्यायालयात ए.आर. रहमानविरुद्ध कॉपीराइट उल्लंघनाचा खटला दाखल करण्यात आला आहे. "पोन्नियिन सेल्वन २" या तमिळ चित्रपटातील "वीरा राजा वीरा" या हे गाणे कॉपी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Shruti Vilas Kadam

AR Rahman News: सुप्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान यांच्यावर 'पोन्नियिन सेल्वन २' या चित्रपटातील 'वीरा राजा वीरा' या गाण्याच्या चौर्यप्रकरणात २ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ध्रुपद गायक उस्ताद वसीफुद्दीन डागर यांनी आरोप केला आहे की, रहमान यांनी त्यांच्या वडिलांनी आणि काकांनी १९७८ मध्ये सादर केलेल्या 'शिव स्तुती' या रचनेंची नक्कल केली आहे. या रचनेची पहिला रेकॉर्डिंग १९७८ मध्ये नेदरलँड्समधील रॉयल ट्रॉपिकल इन्स्टिट्यूट येथे झाला होता .

डागर यांनी दावा केला की, रहमान यांनी त्यांच्या कुटुंबाची परवानगी न घेता या गाण्याची चाल वापरली आहे, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या कलात्मक हक्कांचे उल्लंघन झाले आहे. त्यांनी रहमान आणि मणिरत्नम यांच्या प्रॉडक्शन हाऊस 'मद्रास टॉकीज'ला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. डागर यांनी सांगितले की, "जर मद्रास टॉकीज आणि रहमान यांनी आमची परवानगी घेतली असती, तर आम्ही कधीही नकार दिला नसता. परंतु व्यावसायिक फायद्यासाठी असे करणे अत्यंत समस्याजनक आहे" .

न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह यांच्या एकल खंडपीठाने स्पष्ट केले की हे गाणे केवळ प्रेरित नव्हते तर फक्त किरकोळ बदलांसह 'शिवस्तुती'ची संपूर्ण कॉपी आहे. न्यायालयाने रहमान आणि चित्रपट निर्मिती कंपनी मद्रास टॉकीजला या गाण्याचे उस्ताद नसीर जहीरुद्दीन डागर आणि कै. उस्ताद नासिर फैयाजुद्दीन डागर यांना श्रेय देण्याचे आदेश दिले आहेत.

आर्थिक दंड आणि आदेश

न्यायालयाने रहमान आणि चित्रपट निर्मिती कंपनी मद्रास टॉकीजला २ कोटी रुपये जमा करण्याचे आणि वादी डागर यांना २ लाख रुपये खर्च देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, ओटीटी आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एक नवीन क्रेडिट स्लाईड टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT