Apoorva Mukhija Saam Tv
मनोरंजन बातम्या

Apoorva Mukhija: 'दुबईच्या शेखने १५ कोटी दिले, तर त्याच्यासोबत...'; रिबेल किड अपूर्वा मुखीजाच्या वक्तव्यावरून नवा वाद

Apoorva Mukhija: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अपूर्वा मुखीजाचा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. दुबईच्या शेखबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नेटिझन्समध्ये चर्चा आणि वादाला पुन्हा उधाण आले आहे.

Shruti Vilas Kadam

Apoorva Mukhija: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कंटेंट क्रिएटर अपूर्वा मुखीजा म्हणजेच ‘द रेबेल किड’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यातील एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अपूर्वा कास्टिंग काउच आणि मनोरंजन क्षेत्रातील तडजोडीबद्दल बोलताना दिसते. या व्हिडिओमध्ये ती विनोदी आणि सारकॅस्म वापरत म्हणाली की, “एखाद्या छोट्या भूमिकेसाठी किंवा २- ३ रुपयांसाठी मी कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही. मात्र जर एखादा दुबईचा शेख 10 ते 15 कोटी रुपये देत असेल, तर त्याबाबत विचार करू शकते.' हे वक्तव्य आता सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आले आहे.

याच व्हिडीओमध्ये अपूर्वाने एका कास्टिंग डायरेक्टरसोबत झालेल्या संवादाचाही उल्लेख केला आहे. तिने सांगितले की, एका व्यक्तीने कामाच्या निमित्ताने संपर्क साधला होता. पण, त्याच्यासोबत बोलताना मला तो व्यक्ती बरोबर नाही वाटला मी चेहऱ्यावरुन दाखवलं नाही पण मी स्वतःचा नंबर न देता मॅनेजरचा नंबर दिला.

प्रणित मोरेच्या शो मधील झालेल्या ३७० बिर्याणी आणि मृतदेहाच्या मस्करीनंतर हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कमेंट येत आहेत. काही जणांनी हे वक्तव्य विनोदाच्या स्वरूपात घेतले असून तिने आताची बॉलिवूडची खरी परिस्थिती सांगितली असे म्हटले आहे. तर, काहींनी असे स्टेटमेंट करताना अधिक विचार केला पाहिजे असे मत व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Vs MNS : कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं! सत्ताधारी भाजप-मनसेतच जुंपली; काळेंची टीका, म्हात्रेंचा इशारा

Maharashtra News Live Update: नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या आवाजाची चाचपणी...

Sambhjinagar News : संपूर्ण कुटुंबाला डेंग्यूची लागण, वडील अन् बहीण ICU मध्ये दाखल, १२ वर्षाच्या पोटच्या मुलाचा मृत्यू

Diabetes Diet : डायबिटीजच्या रुग्णांनी केळी खावी की टाळावी? जाणून घ्या किती प्रमाणात खाणे योग्य

Konkan Fort : समुद्राच्या लाटांशी झुंज देत आजही दिमाखात उभा! कोकणात लपलाय १७व्या शतकातील 'हा' भव्य किल्ला

SCROLL FOR NEXT