Anushka Sharma will be seen in the role of Jhulan Goswami in the film Chakda Express Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chakda Xpress : अनुष्का शर्माला व्हायचंय 'झुलन गोस्वामी'; थेट इंग्लंडमध्ये जाऊन घेणार स्पेशल ट्रेनिंग

लवकरच अनुष्का एक नवीन व्यक्तिरेखा साकारणार आहे. ज्यामध्ये ती क्रिकेटच्या मैदानावर चौकार आणि षटकार मारताना दिसणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने(Anushka Sharma) चित्रपटांत आतापर्यंत साकारलेली भूमिका अविस्मरणीय ठरली आहे. आता लवकरच अनुष्का एक नवीन व्यक्तिरेखा साकारणार आहे. ज्यामध्ये ती क्रिकेटच्या मैदानावर चौकार आणि षटकार मारताना दिसणार आहे.

अनुष्का शर्मा सध्या तिच्या आगामी 'चकडा एक्स्प्रेस'(Chakda Xpress) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असून, हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेटर झुलन गोस्वामीचा बायोपिक आहे. या चित्रपटात अनुष्का झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, या चित्रपटाबाबत एक खास अपडेट समोर आली आहे. झूलन गोस्वामीची भूमिका पडद्यावर साकारण्यासाठी अनुष्का खूप मेहनत घेत आहे आणि त्यासाठी ती खास प्रशिक्षणही घेत आहे, असे सांगितले जात आहे. माहितीनुसार, अनुष्का लवकरच क्रिकेटच्या स्पेशल ट्रेनिंगसाठी इंग्लंडला जाणार आहे.

माहितीनुसार, अनुष्काच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, अनुष्का तिच्या लूक आणि कामाबद्दल खूप परफेक्ट आहे. ती त्यात कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. ती आपल्यातील क्रिकेट कौशल्यात अधिक सुधारणा करण्यासाठी इंग्लंडमध्ये प्रशिक्षण घेणार आहे. यासाठी ती लवकरच इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. चित्रपटाचा काही भाग शूट करण्यापूर्वी ती क्रिकेटचे कौशल्य आणखी सुधारणार आहे. अनुष्का ऑगस्टच्या मध्यापासून ते सप्टेंबरपर्यंत एका खास सीनच्या शूटिंगसाठी स्वत:ला पूर्णपणे तयार करून अनुष्का भारतात परतेल.

अनुष्का शर्मा यूके (UK) मधील लोकप्रिय क्रिकेट मैदान, लॉर्ड्स स्टेडियमवर या खास सीनचे शूटिंग करणार आहे. याशिवाय यूकेमधील हेडिंग्ले स्टेडियम या आणखी एका स्टेडियममध्ये या चित्रपटाची शूटिंग केली जाऊ शकते. त्याचबरोबर निर्मात्यांनी भारतातील टॉप स्टेडियममध्ये या चित्रपटाची शूटिंग करण्याची योजना देखील आखली आहे.

दिग्दर्शक प्रोसित रॉय 'चकडा एक्स्प्रेस'चे दिग्दर्शन करत असून, कर्णेश या चित्रपटाचा निर्माता आहे. त्याचबरोबर अभिषेक बॅनर्जीने चित्रपटाचे लेखन केले आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अनुष्का शर्मा ४ वर्षांनंतर 'चकडा एक्सप्रेस'मधून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. अनुष्का शेवटची २०१८ मध्ये 'झिरो'या चित्रपटांत दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT