मुंबई: बॅालिवूड अभिनेत्री आलिया भट्ट(Alia Bhatt) तिच्या आगामी चित्रपट 'डार्लिंग्स'मुळे तुफान चर्चेत आहे. अलीकडेच आलिया भट्टच्या 'डार्लिंग्स'(Darlings) चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. हा चित्रपट उद्या म्हणजेच ५ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधीच सोशल मीडियावर #BoycottAliaBhatt हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटानंतर नेटिझन्सने आलिया भट्टच्या आगामी 'डार्लिंग्स' चित्रपटावर आक्षेप नोंदवला आहे.
नुकताच आलियाच्या 'डार्लिंग्स' (darlings) चित्रपटाचा ट्रेलर रीलीज झाला आहे. दरम्यान चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर नेटिझन्सने आता आलियाच्या चित्रपटातील कथानकावर आक्षेप घेतला आहे. चित्रपटातून आलिया (Alia Bhatt) ही पुरूषांवरील कौटुंबिक हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप नेटिझन्सने केला आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आलिया तिचा पती विजय वर्माचा बदला घेण्यासाठी त्याचं अपहरण करताना दाखवण्यात आली आहे. तसेच आलिया पतीला तव्याने मारताना त्याच्या तोंडावर पाणी फेकताना, पेनने मारताना, ज्या पद्धतीने वागवताना दाखवण्यात आले आहे, याच तिच्या दृश्यांमुळे नेटकऱ्यांनी आलिया भट्टच्या 'डार्लिंग्स' चित्रपटावर आक्षेप घेतला आहे.
'डार्लिंग्स' सारखा गैरसमज पसरवणारा चित्रपट बनवल्याबद्दल प्रत्येकाने #BoycottAliaBhatt करायला हवा, असं एका ट्विटर युजरने नमूद केले. 'पुरुषांवरील कौटुंबिक हिंसाचार हा बॉलिवूडसाठी एक विनोद आहे.', असं अन्य एका यूजरचं म्हणणं आहे.
'आम्ही पुरुषांवरील कौटुबिंक हिंसाचार सहन करणार नाही. #BoycottAliaBhatt आलिया ही पुरुषांवरील कौटुंबिक हिसांचाराच्या घटनांना प्रोत्साहन देत आहे, असे अन्य एका यूजरने म्हटले आहे. आलिया भट्टने #Darlings मध्ये फक्त अभिनयच केला नाही, तर चित्रपटाची निर्मितीही केली आहे.
'डार्लिंग्स' चित्रपटात आलिया आणि विजयसोबत शेफाली शाह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा एक डार्क कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये आलिया आणि शेफाली शाह आई-मुलीच्या भूमिकेत दिसणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.