Bigg Boss 18  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 : छोट्या पडद्यावरचा सुपरस्टार घेणार सलमानची जागा? बिग बॉस होस्ट करण्याची इच्छा केली व्यक्त

Bigg Boss 18 Host : सध्या प्रेक्षक बिग बॉस 18ची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, हा शो सलमान खान होस्ट करणार याची चर्चा देखील रंगली आहे. अशात एका टिव्ही अभिनेत्याने बिग बॉस होस्टिंग करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र बिग बॉस 18 ची चर्चा पाहायला मिळत आहे. स्पर्धकांच्या नावाबरोबरच शो कोण होस्ट करणार याच्या देखील चर्चा चांगल्या रंगल्या आहेत. हा शो आजवर बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) होस्ट करत आला आहे. हा सीजन देखील तो होस्ट करेल असे बोले जात आहे. याच दरम्यान एका टिव्ही अभिनेत्याने आपली बिग बॉस संबंधित इच्छा व्यक्त केली आहे. या अभिनेत्याने होस्टिंग करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

'अनुपमा' (Anupama ) फेम सुधांशु पांडे सध्या सोशल मीडियावर भलताल चर्चेत आहे. त्यांने नुकतीच 'अनुपमा' सिरियल सोडली आहे. या सिरियल मधील वनराजच्या पात्राने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आता या भूमिकेला नवा चेहरा मिळाला आहे. रक्षाबंधन पासून त्यांनी हा शो सोडला. मात्र अलिकडेच त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करून ही बातमी अधिकृतरित्या जाहीर केली.

सध्या सोशल मीडियावर सुधांशुने कार्यक्रम का सोडला? यांच्या कारणांची चर्चा होताना पाहायला मिळत आहे. यासंबंधित अनेक कारणे समोर आली आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे निर्मात्यांसोबत निर्माण झालेले मतभेद होय. 'अनुपमा' सिरियलचे निर्माते राजन शाही यांच्यासोबत सुधांशुचे ((Sudhanshu Pandey ) काही काळ खटके उडत होते. तसेच त्यांचे को-स्टार रुपाली गांगुलीसोबत देखील मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सध्या या सर्व कारणांमध्ये एक मोठे कारण समोर आले आहे की, सुधांशू पांडेला 'बिग बॉस 18' ची ऑफर देण्यात आली आहे. सोशल मीडिया रिपोर्टनुसार, शो मध्ये गौरव खन्नाच्या एन्ट्रीनंतर वनराजची व्यक्तिरेखा निगेटिव्ह रोल मध्ये गेली आणि सिरियलला थोडे रोमँटिक वळण आले. वनराज हे मालिकेतील महत्त्वाचे पात्र असूनही त्याला योग्य प्रतिसाद देण्यात आला नाही. ज्यामुळे अभिनेत्याने शो सोडला.

एका मिडिया मुलाखतीत, सुधांशु पांडेने आपल्याला बिग बॉसमध्ये सहभागी होण्यात अजिबात रस नाही, असे सांगितले आहे. तसेच जर देवाची इच्छा असेल तर हा शो होस्ट करण्याची नक्कीच मला संधी मिळेल. असे सांगितले. पुढे तो म्हणाला की, कार्यक्रमांचे होस्टिंग करणे मला फार आवडते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT