Rupali Ganguly SAAM TV
मनोरंजन बातम्या

Rupali Ganguly : 'अनुपमा'च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, रुपाली गांगुली मालिका सोडणार असल्याची चर्चा

Rupali Ganguly Quit Anupama Serial : 'अनुपमा' या प्रसिद्ध मालिकेत नवीन बदल घडून येणार आहेत. तसेच मालिकेची मुख्य अभिनेत्री रुपाली गांगुली शो सोडत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Shreya Maskar

'अनुपमा' (Anupama ) मालिका खूप वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत अनेक वेळा बदल घडून आले. तरीही 'अनुपमा' मालिका ही अनेकांची आवडती आहे. सध्या ही मालिका पुन्हा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर या मालिकेतील 'अनुपमा'चे पात्र साकरणारी अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) शो सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

'अनुपमा' ही हिंदीतील सर्वात लोकप्रिय मालिका आहे. या शोमधून आतापर्यंत अनेक मोठ्या कलाकरांनी निरोप घेतला आहे. मात्र आता पुन्हा एकदा या शोमधील एक सदस्य मालिका सोडत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून 'अनुपमा' म्हणजे रुपाली गांगुली आहे. यामुळे चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'अनुपमा' या मालिकेने 15 वर्षांची लीप घेतली आहे. या मालिकेत आता नवे चेहरे पाहायला मिळत आहे. नवीन कथा काय असणार? हे जाणून घेण्यास चाहते देखील उत्सुक आहेत. शोचे निर्माते मालिकेत प्रेमाचे त्रिकूट दाखवणार आहेत. या बदलामुळे रुपालीचे पात्र म्हणजे अनुपमाला बाजूला केले जाऊ शकते. असे बोले जाते. रुपाली गांगुलीने गेल्या 4 वर्षांपासून 'अनुपमा'मधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र अशी चर्चा रंगली आहे की, रुपाली गांगुली तीन महिन्यांत या शोचा निरोप घेणार आहे.

'अनुपमा' या मालिकेमध्ये 15 वर्षांची लीप दाखवण्यात आली आहे. ज्यामुळे कथेमध्ये अनेक बदल झालेले पाहायला मिळत आहे. तसेच नवीन पात्रांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे रुपाली गांगुली आता शोमधून एक्झिट घेणार असे बोले जात आहे. रुपाली गांगुलीने शो सोडला तर तेचे पात्र कोण साकारणार? हे पाहणे विशेष ठरणार आहे.

'अनुपमा'मधून रुपाली गांगुलीची एक्झिट शोचा मोठा टर्निंग पॉइंट ठरेल. 'अनुपमा' पात्राने शोला उंच शिखरावर नेले आहे. तशीच ही व्यक्तिरेखा रुपाली गांगुलीने खूपच छान पद्धतीने हाताळली आहे. या बातमीने रुपालीचे चाहते खूप नाराज आहेत. मात्र अद्यापही यावर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

Tuesday Horoscope: पैशाच्या समस्या दूर होणार, या ५ राशींना घ्यावी लागणार काळजी? वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Pune Fort : मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला तुम्ही पाहिलाय का? अनेक पर्यटकांच्या नजरेआड आहे 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Accident News: बेंगळुरूहून मुंबईकडे निघाली ट्रॅव्हल्स बस, साताऱ्यात ड्रायव्हर बदलला; सारोळे उड्डाणपुलाजवळ येताच मोठा अपघात

Maharashtra News Live Update: करडे घाटात गोळीबार; सराईत गुन्हेगार विशाल काळेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT