Anupam Kher An Emotional Video  Instagram @anupampkher
मनोरंजन बातम्या

Anupam Kher At Prayer Meet: जा तुला माफ केलं... अनुपम खेर यांची मित्राच्या आठवणीत भावनिक पोस्ट

Satish Kaushik's Prayer Meet: सतीश यांच्या निधनानंतर होणाऱ्या सर्व कार्यक्रमात अनुपम उपस्थित होते.

Pooja Dange

Satish Kaushik's prayer meet: अभिनेते आणि चित्रपट निर्माते सतीश कौशिक यांचे ८ मार्च, २०२३ रोजी निधन झाले. होळीचे सेलिब्रेशन झाल्यानंतर काही काही वेळाने त्यांचे हार्ट अटॅक निधन झाले. अनुपम खेर सतीश कौशिक यांचे जवळचे मित्र आहेत. सतीश यांच्या जाण्याने त्यांने खूप धक्का बसला. अद्याप ते यातून स्वतःला सावरू शकलेले नाहीत.

अनुपान खेर यांनी सतीश यांच्या निधनानंतर अनेक पोस्ट शेअर मित्र गमावल्याचे दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मित्रासाठी प्रार्थना देखील केल्या आणि तसेच सतीश यांच्यासोबतच्या अनेक आठवणी सांगितल्या होत्या.

अनुपम खेर यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अनुपम यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनुपम सतीश यांच्या फोटोसमोर फुले अर्पण करत आहेत. तसेच थाट जोडून प्रार्थना करत असल्याचे देखील दिसत आहेत.

या व्हिडिओ अनुपम यांनी एक भावनिक कॅप्शन दिले आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, जा!!! तुला माफ केलं! मला एकटं सोडून गेलास ना त्यासाठी!! तू मला लोकांच्या हास्यामध्ये नक्कीच भेटशील! पण आपल्या मैत्रीची रोजच आठवण येत राहील!! अलविदा माझ्या मित्र! तुझे आवडते गाणे लावले आहे बॅकग्राऊंडला! तुला सुद्धा आठवण येईल!! ❤️💔🕉❤️ #SatishKaushik #Friend #Friendship #ओमशांति.' तर या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला अनुपान यांनी म्हटल्याप्रमाणे सतीश याचे आवडते गाणे 'डॉ लफ्झो कि है दिल की कहाणी' लावले आहे.

अनुपम खेर आणि सतीश कौशिक यांची मैत्री गेल्या ४५ वर्षांपासून होती. ते दोघे खूपच जवळचे मित्र होते. त्यामुळे सतीश यांच्या निधनानंतर होणाऱ्या सर्व कार्यक्रमात अनुपम उपस्थित होते. सतीश यांच्या निधनानंतर काळ प्रेयर मीटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनुपम सतीश यांच्या मुलीला धीर देताना दिसले.

या प्रेयर मीटला बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील अनेक कलाकार उपस्थित होते. विद्या बालन, जॅकी श्रॉफ, पंकज कपूर, सुप्रिया पाठक, मौसमी चॅटर्जी, तन्वी अजीम, पद्मिनी कोल्हापुरे, मनीष पॉल, गुलशन ग्रोव्हर, बोनी कपूर, रमेश तैरानी, डेव्हिड धवन, अब्बास-मस्तान, विवेक अग्निहोत्री, जावेद अख्तरसह अनेक कलाकारांनी सतीश यांच्यासाठी प्रार्थना केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT