4 Blind Men Saam Tv
मनोरंजन बातम्या

4 Blind Men : सगळे सुटणार…? का सगळेच अडकणार…?; अंकुश चौधरीचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

अंकुश चौधरीचा '४ ब्लाइंड मेन' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील एकापेक्षा एक भन्नाट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. बॉक्स ऑफीसवर मराठी चित्रपट नवा इतिहास रचत आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले 'दगडी चाळ २'(dagdi chawl 2), 'दे धक्का २' हे चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई करत आहे. याचदरम्यान आणखी एका थ्रिलर चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'दगडी चाळ २' नंतर अभिनेता अंकुश चौधरी(Ankush Chaudhari) आता आणखी एक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अंकुश चौधरीचा '४ ब्लाइंड मेन' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. अंकुशने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत त्याच्या आगामी चित्रपटाची माहीती दिली आहे. या पोस्टरमध्ये तीन व्यक्तींच्या डोळ्यांना पट्टी बांधलेली आहे. पोस्टर शेअर करत अंकुशने, नरकाचे दरवाजे: काम, क्रोध, लोभ आणि ? एक नवा खेळ…चार खेळाडू…क्षितीश दाते, संकर्षण कऱ्हाडे, शुभंकर तावडे आणि अंकुश चौधरी…सगळे सुटणार…? का सगळेच अडकणार…? असे सस्पेंसफुल कॅप्शन लिहिले आहे.

'४ ब्लाइंड मेन' हा चित्रपट ४ अंध व्यक्ती आणि हत्ती यांवर आधारित प्रसिद्ध बोधकथेवर चित्रित केला आहे. या चित्रपटात ४ वेगवेगळ्या वळणावरती असणाऱ्या या अंधव्यक्ती काही असामान्य परिस्थितीत सापडल्या असून नशीब त्यांना एकत्र घेऊन येते. नितीन वैद्य निर्मित आणि अभिषेक मेरुकर दिग्दर्शित या चित्रपटात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत झळकत असून शुभंकर तावडे, संकर्षण कऱ्हाडे, शेखर दाते व मृण्मयी देशपांडे या कलाकारांची फौज या चित्रपटात दिसणार आहे.

अलीकडेच, दिग्दर्शक अभिषेक मेरूकर या चित्रपटाबद्दल आपले मत व्यक्त करत म्हणाला, 'जेव्हा मला या चित्रपटावर काम करण्याची संधी मिळाली, त्यावेळी मला मराठी चित्रपटसृष्टीतील जबरदस्त कलाकारांची फौज हवी होती, जे कलाकार चित्रपटातील पात्रांची भूमिका योग्य प्रकारे पार पाडतील,आणि असे कलाकार मला भेटले आहेत. मराठी चित्रपसृष्टीत पहिल्यांदाच थ्रिलर हा चित्रपटाचा प्रकार अनुभवला जात आहे. सर्वच कलाकारांनी आपआपल्या भूमिकेला चांगलाप्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिल्यानंतरच्या त्यांच्या प्रतिक्रियेची मला उत्सुकता लागलेली आहे.'

नुकताच अंकुश चौधरी चा 'दगडी चाळ २' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता या नव्या कोऱ्या चित्रपटात अंकुश कोणती भूमिका साकारणार आहे. तसेच या चित्रपटात नक्की काय सस्पेन्स आहे, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Martyred Policemen: शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना मिळणार २ कोटींची मदत, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Daler Mehndi: 'गायक दलेर मेहंदी दारू पिऊन स्टेजवर आले'; त्या व्हायरल व्हिडिओने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

ZP Election : दसऱ्यानंतर भाजपचा मास्टरस्ट्रोक, काँग्रेसच्या बालेकिल्यात ४० जणांनी हातात धरलं कमळ

Maharashtra News Live Update: डोंबिवलीत पुलावर लटकून तरुणाचा गोंधळ; नागरिकांच्या धाडसामुळे टळली दुर्घटना

Fact Check : प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट ८ लाख रुपये मिळणार, राज्य सरकारने सांगितले सत्य

SCROLL FOR NEXT