मुंबई : अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषी कृष्ण देशपांडे(Rishi Deshpande) दिग्दर्शित 'समायरा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले. या पोस्टरमध्ये अभिनेत्री केतकी नारायण अव्हेंजर बाईक चालवताना दिसत आहे. केतकी या लूकमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता चाहत्यांना निर्माण झाली आहे. सध्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू असून निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी महिलांच्या बाईक रॅलीचे आयोजन केले होते.
स्वंतत्र आणि सकारात्मक दृष्टीकोन असलेली समायरा स्वत:च्या शोधात निघालेल्या तिच्या प्रवासाची कथा या चित्रपटात आहे. नुकतंच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात बाईक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत 'समायरा'(samaira) सोबत पुण्यातील अनेक महिलांनी बाईक चालवली. या बाईक रॅलीत पुण्यातील बऱ्याच महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. 'समायरा' च्या प्रवासाची ही कहाणी सर्वांपर्यंत पोहचावी हा बाईक रॅलीचा मुख्य उद्देश होता.
यादरम्यान केतकी नारायण, 'समायरा' ही एक सोलो ट्रिपवर निघालेल्या मुलीची कथा आहे. सगळ्याच महिला आपापल्या आयुष्यात फायटर असतात. सर्व जबाबदाऱ्या त्या अगदी चोख पार पडतात व आपल्यासोबत आपल्या परिवाराला ही पुढे घेऊन जातात. आजच्या या बाईक रॅलीत मी या सर्व स्ट्रॉंग महिलांबरोबर माझे 'समायरा' हे निर्भीड पात्र प्रेक्षकांच्या समोर सादर केले आहे. माझ्यासोबतच पुण्यातील महिलांनीही या बाईक रॅलीचा आनंद लुटला ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे." असे तिच्या भावना व्यक करताना म्हणली.
अलीकडेच, 'समायरा' चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषी कृष्ण देशपांडेने सांगितले की, सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवनवीन विषय हाताळले जात आहेत. त्याचप्रमाणे ही कथाही काहीशी वेगळी आहे, प्रत्येक जण आयुष्य जगण्यासाठी प्रवास करत असतो. तसाच एक प्रवास 'समायरा' चा देखील असणार आहे'.
'समायरा' या चित्रपटाची निर्मिती डॉ जगन्नाथ सुरपूरे, रतन सुरपूरे, शशिकांत पनत, योगेश आळंदकर यांनी केली असून चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुमित विलास तांबेने लिहिली आहे. ऋषी कृष्ण देशपांडे दिग्दर्शित 'समायरा' हा चित्रपट २६ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आहे. आता 'समायरा' चा प्रवास तिचे ध्येय साकारेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.