Ankita-Vicky Photos SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ankita-Vicky Photos : हॉस्पिटलमधून नवरा घरी आल्यावर अंकिताने शेअर केला फोटो, नेटकऱ्यांना आठवले 'मानव-अर्चना'

Ankita Lokhande-Vicky jain Romantic Photoshoot : अंकिता लोखंडेने विकी जैनसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहत्यांना 'पवित्र रिश्ता' मधील मानव आणि अर्चनाची आठवण झाली आहे.

Shreya Maskar

अंकिता लोखंडे आणि विकी जैन टिव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडी आहे.

अंकिताने नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

अंकिता-विकीला पाहून चाहत्यांना मानव आणि अर्चनाची आठवण झाली आहे.

टिव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगली चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अंकिताच्या नवऱ्याचा विकी जैनचा अपघात झाला. त्याच्या हाताला 45 टाके पडले. आता अंकिता आणि विकी (Vicky jain) घरी परतले आहेत. नुकतेच अंकिताने नवऱ्यासोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. ज्यात त्यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

अंकिता लोखंडेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोघेही एकमेकांच्या मिठीत पाहायला मिळत आहे. दोघांच्या चेहऱ्यावर निखळ हास्य दिसत आहे. अंकिताने फोटोंना खूप खास कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलं की, "प्रेम फक्त हृदयात नसते, ते एकत्र राहण्याच्या संतुलनात, हेतूंच्या शुद्धतेत आणि प्रत्येक मिठीत असते." त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. नेटकऱ्यांना अंकिता आणि विकीच्या रोमँटिक पोज पाहून 'पवित्र रिश्ता'मधील मानव आणि अर्चनाच्या जोडीची आठवण आली.

'पवित्र रिश्ता' ही खूप गाजलेली मालिका आहे. मालिकेत मुख्य भूमिकेत अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत झळकले होते. मालिकेतील त्यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांना नेहमी भुरळ घातली. "सुंदर कपल", "अर्चनाचा मोठा चाहता", "छान दिसताय", "माझे आवडता जोडी", "नजर ना लागे दोनो को" अशा कमेंट्स चाहते करत आहेत.

फोटोमध्ये अंकिता जांभळ्या रंगाच्या सुंदर साडीत दिसत आहे. तिने डायमंड आणि मोत्यांची ज्वेलरी परिधान केली आहे.विकी जैन लाइट गुलाबी रंगाचा फ्लोरल प्रिंटेड कुर्ता परिधान केला आहे. दोघेही एकत्र खूपच क्युट दिसत आहेत. अंकिता लोखंडे आणि विकी जैन अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र स्पॉट होतात. ते दोघे बिग बॉसमध्ये देखील दिसले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Recherge Plan: Vi चा 'हा' प्रीमियम प्लॅन Jio-Airtel पेक्षा महाग, पण मिळतात जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या

रत्नागिरीत मनसेला धक्का; बडा नेता भाजपच्या गळाला लागला, शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश होणार

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये पावसाचा हाहाकार, परांड्यात १३१ जण पाण्यात अडकले, शेकडो जनावरांचा मृत्यू

BMC Election: मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग, ६५०० बूथ अधिकारी अन्...; कसा आहे संपूर्ण प्लान?

Parbhani : परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीचा कहर; शेतकऱ्यांचे भाजीपाल्याचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT