Ankita Lokhande Husband Vicky Jain Hospitalized Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vicky Jain Hospitalized: अंकिता लोखंडेच्या नवऱ्याची तब्येत बिघडली, विकी जैनला रुग्णालयात केलं दाखल

Ankita Lokhande Husband Vicky Jain Hospitalized: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेचा नवरा विकी जैनला रुग्णालयात दाखल केलं आहे. समर्थ जुरेलने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करुन याची माहिती दिली.

Shruti Vilas Kadam

Ankita Lokhande Husband Vicky Jain Hospitalized: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या अभिनयाने लोकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडत नाही. अंकिता लोखंडे आणि विकी जैन अनेकदा नेहमीचं चर्चेत असतात. पण अलीकडेच अभिनेत्रीचा नवरा विकी जैनला रुग्णालयात दाखल केलं आहे आणि त्याच्या एका हाताला पट्टी बांधलेली दिसत आहे, तर दुसऱ्या हाताला सलाईनची ड्रिप लावलेले दिसत आहे. विकी जैनचा हा व्हिडिओ अभिनेता समर्थ जुरेलने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

समर्थ जुरेलने इंस्टाग्राम स्टोरीवर विकी जैनचा व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये अंकिता लोखंडे देखील दिसत आहे. व्हिडिओमध्ये विकी जैनच्या हाताला पट्टी बांधलेली आणि डाव्या हातात सलाईनची ड्रिप लावलेली दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये समर्थ जुरेलने लिहिले आहे, "लवकर बरा हो दादा. माझा टोनी शार्क."

या व्हिडीओमध्ये समर्थ जुरेल अंकिता लोखंडेच्या खांद्यावर डोकं ठेवून रडण्याचा अभिनय करताना दिसत आहे. पण, विकी जैनला रुग्णालयात दाखल करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

विकी जैनचा व्हायरल व्हिडिओ पाहून चाहते त्याच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. विकी जैनने अंकिता लोखंडेसोबत 'बिग बॉस १७' मध्ये सहभागी झाले होते. पण फिनालेपूर्वीच विकी जैनला घरातून बाहेर जावे लागले. 'बिग बॉस १७' व्यतिरिक्त, विकी जैनने 'लाफ्टर शेफ्स' च्या दोन्ही सीझनमध्ये अंकिता लोखंडेसोबतही भाग घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Tourism : 'हा सागरी किनारा'; कोकणात गेल्यावर 'या' बीचवर मारा फेरफटका

Bigg Boss 19 : किचनमध्ये गेला अन्...; अमाल मलिकचा घाणेरडेपणा पाहून नेटकऱ्यांना राग अनावर- VIDEO

Maharashtra Live News Update : 'कुणबी'बाबत आज सुनावणी

Murmura Chikki Recipe : घरीच १० मिनिटांत बनवा मुरमुरा चिक्की, हिवाळ्यात खाण्यासाठी हेल्दी स्नॅक्स

Maharashtra politics : शिवसेना आमदार अजित पवारांवर नाराज, एकनाथ शिंदेंकडे केली तक्रार?

SCROLL FOR NEXT