मनोरंजन बातम्या

Trupti Dimri: नॅशनल क्रश तृप्ती डिमरी आता रणबीर कपूरची शेजारीण, मुंबईतील अलिशान घराची किंमत ऐकून व्हाल थक्क

Trupti Dimri Buy New House In Mumbai: बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीने मुंबईत स्वतः चे घर घेतले आहे. रणबीर कपूर आणि सलमान खानच्या शेजारीच तृप्तीने घर घेतले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अॅनिमल फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी नेहमीच चर्चेत असते. तृप्ती डिमरी आता नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. तृप्ती डिमरीने अॅनिमल चित्रपटात चांगले काम केले आहे. अॅनिमल चित्रपटामुळे तृप्तीला घराघरात ओळखले जाते. अमिषा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अमिषाने मुंबईत आपले स्वतः चे घर घेतले आहे. तिच्या घराबाबत माहिती समोर आली आहे.

तृप्तीने वांद्रे परिसरात आपले नवीन घर घेतले आहे. वांद्रे परिसरात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची घरे आहेत. तिने वांद्रे परिसरातील एका अपार्टमेंचमध्ये दोन मजले विकत घेतले आहेत. तृप्ती या नवीन घरात शिफ्ट झाल्याचेही सांगण्यात येत आहे. तृप्तीने बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि सलमान खानच्या घराशेजारीच नवीन घर घेतले आहे.

अभिनेत्री तृप्तीने मुंबईत घर घेतल्यानंतर ती आता मुंबईची रहिवासी झाली आहे. मुंबईतील बांद्रा परिसरातील कार्टर रोड येथे घर घेतले आहे. तृप्तीच्या या घराची किंमत १४ कोटी रुपये आहे. तिच्या घराचा २२२६ चौरस फूट एरिआ आहे. तिने ३ जून रोजी घराचे रजिस्ट्रेशन पूर्ण केले. तृप्तीने या घरासाठी ७० लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटी रेखा, रणबीर कपूर, आलिया भट्ट, सलमान खान यांचेही घर तृप्तीच्या घराजवळ आहे. तृप्ती सध्या भूलभूल्लैया २ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. ती लवकरच अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचसोबत पुष्पा २ मध्ये तृप्ती एका आयटम साँगवर डान्स करणार असल्याचे सांगत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT