Amhi Jarange Trailer : "आम्ही जरांगे"चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज

Amhi Jarange Trailer Out : संपूर्ण मराठा समाजाला एकत्र घेवून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास "आम्ही जरांगे" चित्रपटातून रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
Amhi Jarange Trailer : "आम्ही जरांगे"चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज
Amhi Jarange TeaserSaam Tv

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाला बसले आहेत. संपूर्ण मराठा समाजाला एकत्र घेवून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. "आम्ही जरांगे" असं चित्रपटाचं नाव असून हा चित्रपट येत्या १४ जूनला रिलीज होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर रिलीज झाला होता. आता नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे.

Amhi Jarange Trailer : "आम्ही जरांगे"चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज
Kangana Ranaut Post : "हे योग्य असेल तर, बलात्कार अन् खूनही..."; कंगणा रणौतने ट्रोल करणाऱ्यांना सुनावले

"आम्ही जरांगे" या चित्रपटामध्ये फिल्म इंडस्ट्रीतील तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. मनोज जरांगे यांच्या भूमिकेत अभिनेता मकरंद देशपांडे दिसणार आहे. अभिनेता प्रसाद ओक अण्णासाहेब जावळे पाटील ह्यांच्या भूमिकेत, माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या भूमिकेत अजय पुरकर दिसणार आहे. या व्यतिरिक्त चित्रपटामध्ये, सुबोध भावे, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली आरक्षणाची चळवळ मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील लढवत आहे. गेल्या वर्षांपासून सुरू झालेला हा लढा प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. चित्रपटामध्ये, प्रेक्षकांना अण्णासाहेब पाटील आणि अण्णासाहेब जावळे यांच्यापासून सुरु झालेला हा संघर्षांचा इतिहास पाहायला मिळणार आहे. जरांगे पाटील यांनी घेतलेल्या सभा, आंदोलनसह त्यांचं संपूर्ण आयुष्य आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Amhi Jarange Trailer : "आम्ही जरांगे"चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज
Kartik Aaryan News : कार्तिक आर्यनला भेटण्याची इच्छा महागात पडली, तरुणीला ८२ लाखांचा गडा; काय आहे नेमकं प्रकरण ?

चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश पांडुरंग भोसले यांनी केले आहे तर, चित्रपटाची निर्मिती योगेश पांडुरंग भोसले आणि नारायणा प्रॉडक्शन करीत आहे. तर या चित्रपटाचे सह निर्माते, उत्तमराव नारायणराव मगर, डॉ. मधुसूदन उत्तमराव मगर, विक्रम विठ्ठलराव पाटील, दमयंती विठ्ठलराव पाटील, डॉ. दत्ता यशवंतराव मोरे, योगेश पांडुरंग भोसले आहेत. या जबरदस्त क्रांतिकारी चित्रपटाची कथा आणि पटकथा सुरेश पंडित यांनी लिहिली आहे.

Amhi Jarange Trailer : "आम्ही जरांगे"चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज
Kangana Ranaut Slapped : 'आईच्या सन्मानासाठी हजारो नोकऱ्यांचा त्याग करेल...', कंगना रणौतला कानशिलात देणाऱ्या CISF कॉन्स्टेबलचं सडेतोड उत्तर!...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com