Ruchika Jadhav
घर सुंदर दिसावं यासाठी प्रत्येक व्यक्ती घराबाहेर विविध रंगिबेरंगी फुलांची झाडे लावतात.
तुम्हाला उन्हाळ्यात झाड लावायचं असेल तर गुलाबाचं रोप लावा. गुलाब उष्णतेमध्ये सुद्धा जगतं.
जास्वंदाचं फुल विविध रंगांमध्ये देखील असतं. या फुलाला विशिष्ट वास नसला तरी हे फुल फार आकर्षक दिसतं.
उन्हाळ्यात कमी पाण्यामध्ये सुद्धा उगवणारं फुल म्हणजे झेंडूचं फुल. ही फुलं आपल्या घराची शोभा आणखी वाढवतात.
जांभळ्या रंगाचं हे फूल अतिशय नाजूक आणि आकर्षक असतं. त्यामुळे तुम्ही देखील घराशेजारी हे झाड लावू शकता.
चमेलीचा सुगंध फार मनमोहक असतो. सफेद रंगाची चमेली घराबाहेर नक्की लावावी.
पलाश फुलही कमी पाण्यात आणि सुर्यप्रकाशात चांगल्या पद्धतीने उगवतं.
पिटूनीया हे फुल केशरी रंगाचं असतं. त्यामुळे पिटूनीया फुल अनेक व्यक्ती अंगनात लावतात.