Anil Kapoor Saam TV
मनोरंजन बातम्या

Anil Kapoor : ना व्यायाम, ना कुठलं स्पेशल डाएट; अनिल कपूरने उलगडले फिटनेसचे रहस्य!

अनिल कपूरने 'कॉफी विथ करण' या शोमध्ये सांगितलं त्याच्या फिटनेसचं रहस्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सध्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकार मंडळी प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता करण जोहरच्या पॉप्युलर चॅट शो 'कॉफी विथ करण'(Koffee With Karan)मध्ये आपली उपस्थिती दर्शवत आहेत. या कार्यक्रमात बरेच कलाकार आपले अनेक गुपीत सांगतात. करण आपल्या कार्यक्रमात कलाकारांना बुचकळ्यात टाकणारे प्रश्न विचारत असतो. नुकताच या टॉक शोचा एक नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. येत्या नव्या एपिसोडमध्ये बॉलिवूडमधील पिता-पुत्र अशी ओळख असलेले अनिल कपूर(Anil Kapoor) आणि वरुण धवन(Varun Dhawan) आपली उपस्थिती लावणार आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी 'जुग जुग जियो' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून बॉलिवूडची रील पिता-पुत्रही जोडी एकत्र दिसली होती. या दोघांनीही शोमध्ये चांगलाच हश्या पिकवला आहे.

अनिल कपूर हा एक असा अभिनेता आहे जो अनेक दशकांपासून फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहे आणि तो खूप लोकप्रियही आहे. अनिल कपूरच्या कामाचे जेवढे कौतुक केले जाते तेवढेच त्याच्या फिटनेसमुळेही तो प्रकाशझोतात असतो. वयाच्या ६५ व्या वर्षीही अनिल कपूर तरुण दिसतो आणि खूप चपळ आहे. एपिसोडच्या प्रोमोमध्ये करणने यामागचे रहस्य विचारले आणि अनिलने काहीही विचार न करता लगेच उत्तर दिले.

अनिल कपूरने बॉलिवूडध्ये आपले स्थान कायम ठेवत आपल्या चित्रपटांचे अर्धशतक पूर्ण केले आहे. अनिल आपल्या अभिनयासोबतच स्वत:च्या फिटनेसकडेही खूप लक्ष देत असतो. सध्याच्या युवाकलाकारांच्या फिटनेसला सुद्धा लाजवेल अशी अनिलच्या फिटनेसची चर्चा 'कॉफी विथ करण'मध्ये रंगली होती. करण जोहरने जेव्हा अनिलला त्याच्या फिटनेस आणि तारुण्याचं रहस्य काय? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अनिल कपूर म्हणाला, 'सेक्स सेक्स सेक्स या कारणामुळे मी अजून फिट आहे'. अनिलचं हे उत्तर ऐकून सगळेच आवाक झाले. नंतर अनिलने मी मस्करी करतोय असं सांगत विषय बदलला.

अनिल कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयचे झाले तर, हल्लीच त्याचा 'जुग जुग जियो' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये त्याने वरुण धवनच्या वडिलांची भूमिका साकारली होती. तसेच लवकरच अनिल कपूरचे 'फायटर', 'नो एन्ट्री मे एन्ट्री', 'एनिमल' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Blast: दिल्लीत शक्तीशाली स्फोट, आगीचे लोळ, धुराचे लोट; रस्त्यावर रक्ताचा सडा, हादरवून टाकणारे PHOTO

Puffed Chapati Tricks: चपाती तव्यावर नीट शेकत नाही? लगेचच वातड होते? मग ही भन्नाट टिप ठरेल बेस्ट

Bomb Blast in Delhi: दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई, पुण्यासह देशातील अनेक प्रमुख शहरांना अलर्ट

Breast Shape Change: लग्नानंतर स्तनांचा आकार वाढतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या सत्य

Delhi Red Fort Blast : दिल्लीतील स्फोटात ८ जणांचा मृत्यू, हाय अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT