Soundarya Rajinikanth
Soundarya Rajinikanth Saam Tv

रजनीकांत पुन्हा झाले आजोबा, मुलगी सौंदर्याने दिला मुलाला जन्म ; शेअर केला बाळाचा पहिला फोटो

रजनीकांत यांची मोठी मुलगी सौंदर्या रजनीकांत हिने नुकतीच तिच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Published on

मुंबई : साऊथचा सुपरस्टार थलाइवा रजनीकांत(Rajinikanth) यांची मोठी मुलगी सौंदर्या रजनीकांत(Soundarya Rajinikanth) हिने नुकतीच तिच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ट्विटरवर तिने बेबी बंप फ्लॅान्ट करण्याऱ्या थ्रोबॅक फोटोंसह तिच्या बाळाचा फोटो देखील शेअर केला आहे. यासोबतच सौंदर्याने तिच्या मुलाचे नावही शेअर केले आहे.

Soundarya Rajinikanth
Salman Khan House : सलमान खानला नाही जायचे सोडून गॅलेक्सी अपार्टमेंट ; नेमकं काय आहे प्रकरण?

सौंदर्याच्या मुलाचे नाव वीर रजनीकांत बननागमुडी असे ठेवण्यात आले आहे. फोटोमध्ये तिने आपल्या मुलाचा चेहरा दाखवला नसला तरी. यातील एका फोटोत मुलाने तिचे तरी बोट धरले आहे. एका फोटोत सौंदर्या तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे. तसेच आणखी एका फोटोत सौंदर्या तिचा बेबी बम्प फ्लॅान्ट करत आहे. शेवटच्या फोटोमध्ये ती तिचा मोठा मुलगा वेदसोबत पोज देताना दिसत आहे.

Soundarya Rajinikanth
Swara Bhaskar: साथीदार शोधणे म्हणजे कचरा...; स्वरा भास्कर हे असं का म्हणाली?

सौंदर्याने तिच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्वीट केले की, 'देवाच्या कृपेने आणि मोठ्यांच्या आशीर्वादाने, विशगन, वेद आणि मी वेदाचा धाकटा भाऊ वीर रजनीकांत वनगामुडीचे स्वागत करते. आमच्या डॉक्टरांचे खूप खूप आभार'. सौंदर्या आणि विशगनचे लग्न २०१९ मध्ये झाले होते,सौंदर्याने विशगन सोबत हे दुसरे लग्न केले आहे. दुसऱ्या लग्नातील हे त्यांचे पहिले अपत्य आहे. यापूर्वी सौंदर्याचा विवाह अश्विन रामकुमारशी झाला होता आणि त्या दोघांचा पहिला मुलगा वेद आहे.

सौंदर्याच्या या ट्विटवर अनेकांनी तिचे अभिनंदन केले आहे. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चननेही तिला शुभेच्छा दिल्या. रजनीकांत खूप भाग्यवान आहेत की त्यांना चार नातवंडे आहेत, अशी प्रतिक्रिया रजनीकांत यांच्या चाहत्यांनी दिली. त्यांची दुसरी मुलगी ऐश्वर्या हिलाही दोन मुले आहेत. सौंदर्या सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. यासोबतच ती एक ग्राफिक डिझायनर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com