Ananya-Chunky Panday VIDEO SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ananya-Chunky Panday VIDEO : 'मैं तेरा तोता...'; बापलेकीचा जबरदस्त डान्स, चंकी पांडे अन् अनन्या बेफाम होऊन नाचले

Ananya Panday & Chunky Panday Dance Video : सध्या सोशल मीडियावर अनन्या पांडे आणि चंकी पांडे यांचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघे देखील भन्नाट डान्स करताना दिसत आहेत.

Shreya Maskar

बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यापासून अनन्या पांडे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिली आहे. आजवर तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. नुकताच 'झी सिने अवॉर्ड्स' ( Zee Cine Awards 2025 ) पार पडला. या शोमध्ये अनन्या पांडेने (Ananya Panday) चारल चाँद लावले आहेत. तिच्या डान्सचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडिया तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अनन्या पांडे आणि चंकी पांडे बेभान होऊन नाचताना दिसत आहे.

'झी सिने अवॉर्ड्स 2025' 17 मे ला पार पडला आहे. या सोहळ्याला बॉलिवूडचे अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. आपल्या डान्सने कलाकारांनी चाहत्यांना घायाळ केले आहे. या सोहळ्याला अनन्या पांडे आणि चंकी पांडे (Chunky Panday ) या बाप-लेकीच्या जोडीने तर कमालच केली. अनन्या पांडेने 'झी सिने अवॉर्ड्स'मध्ये आपल्या वडिलांच्या (चंकी पांडे ) गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.

चंकी पांडेच्या 'मैं तेरा तोता' या गाण्यावर अनन्या पांडेने कमाल डान्स केला आहे. त्याला शेवटी चंकी पांडे चांगली जोड दिली आहे. 'मैं तेरा तोता' हे गाणे 'पाप की दुनिया' या 1988 ला रिलीज झालेल्या चित्रपटातील आहे. 'मैं तेरा तोता' हा त्या काळचे सुपरहिट गाणे आहे. अनन्याने वडिलांसोबत या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे.

अनन्या डान्स करत असताना चंकी पांडे स्टेजवर एन्ट्री घेतात आणि लेकीसोबत नाचू लागतात. त्याचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चंकी पांडे आणि अनन्या पांडे यांच्या या डान्स व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते त्यांच्या जोडीचे कौतुक करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

KBC 18: दिवसाला ८०० रुपये कमावणाऱ्या कृष्ण कुमावत यांनी KBCमध्ये जिंकले ५० लाख; १ कोटींच्या प्रश्नावर घेतला 'हा' निर्णय

DA Hike 2026 : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! DA मध्ये थेट 3% वाढ? पगारात होणार एवढी वाढ

Gold Price Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळं सोनं २१५०० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

SCROLL FOR NEXT