Anant Radhika Merchant Wedding 12 July 2024 Panchang Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anant- Radhika Wedding Muhurta : अनंत-राधिकाच्या लग्नासाठी १२ जुलैच तारीख का निवडली? कारणही आहे तितकंच खास

Anant Radhika Merchant Wedding 12 July 2024 Panchang : १२ जुलै रोजी अनंत- राधिका मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. खरंतर ही लग्नाची तारीख अनेक अर्थाने खास असून या दिवशी अद्भूत योग जुळून येणार आहे.

Chetan Bodke

अनंत- राधिका यांच्या लग्नाला आता अवघे काही दिवसच राहिले आहेत. अंबानी यांच्या अँटिलिया ह्या घरी लगीनघाई सुरू आहे. नुकतंच हळदीचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमानिमित्त अँटिलियाला विद्युत रोषणाई करण्यात आली असून त्यांच्या घरी पाहुण्यांची रेलचेल पाहायला मिळत आहे. येत्या १२ जुलै रोजी अनंत- राधिका मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. खरंतर हा लग्नाचा मुहूर्त खास आहे. ही तारीख अनेक अर्थाने विशेष असून या दिवशी अद्भूत योग जुळून येणार आहे.

१२ जुलै रोजी आषाढ शुक्ल पक्षातील खष्ठी तिथी आहे. ही तिथी दुपारी १२:३४ पर्यंत असणार असून नंतर सप्तमी तिथी सुरू होणार आहे. अनंत- राधिका यांचं लग्न सप्तमी तिथीमध्ये होणार आहे. ही तिथी विवाहासाठी शुभ मानली जाते, असे म्हटले जात आहे. दुपारी ४ च्या नंतर उत्तर फाल्गुनी नक्षत्राला सुरूवात होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या तिथीच्या आणि नक्षत्राच्या दिवशी लग्न केल्यास शुभ मानले जाते. त्यासोबतच शुक्रवार हा दिवसही लग्नासाठी शुभ मानला जातो.

लग्नासाठी १२ जुलै ही तारीख विशेष का आहे ?

१२ जुलैला गुरु आणि शुक्र हे दोघेही वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. हस्त हे १३ वे नक्षत्र आहे, या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. या दिवशी लग्नाचा अतिशय शुभ योगायोग असेल. दोघांचेही वैवाहिक जीवन खूप सुंदर असेल. दोघेही एकमेकांसाठी खूप भाग्यवान असतील. असे मानले जाते की, या नक्षत्रात लग्न करणे शुभ मानले जाते.

या नक्षत्रात होणारे लग्न जास्त काळ टिकतात आणि यशस्वीही होतात. हे नक्षत्र जोडप्यासाठी सुख, सामंजस्य, समाधान आणि समृद्धी आणते, अशी मान्यता आहे. लग्नासाठी हा संपूर्ण दिवस शुभ आहे. १२ जुलै २०२४ पासून सकाळी पहाटे ०५:१५ मिनिटांपासून लग्नाचा शुभमुहूर्त सुरू होणार आहे. हा मुहूर्त दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ जुलै २०२४ च्या पहाटे ०५:३२ पर्यंत आहे. ज्योतिषांच्या मते हा मुहूर्त विवाहासाठी शुभ मुहूर्त मानला जात आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शुभ विवाह मुहूर्त शुक्रवार, १२ जुलै २०२४ रोजी आहे. तर शुभाशीर्वाद मुहूर्त शनिवार, १३ जुलै २०२४ रोजी आहे. तर रिसेप्शन रविवार, १४ जुलै २०२४ रोजी आहे. हे सर्व कार्यक्रम मुंबईच्या वांद्रातील बीकेसी (बांद्रा कुर्ला संकुल)मध्ये पार पडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ulhasnagar: घराबाहेर पडला अन् टेरेसवर जाऊन स्वत:ला पेटवून घेतलं; उल्हासनगरमध्ये खळबळ

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी देवीचं मुख्य गाभाऱ्यातील दर्शन १० दिवस बंद राहणार! | VIDEO

Bank Jobs: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ३३० पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update: राज्यातील पाऊस झाला कमी, विदर्भाला येलो अलर्ट

GK: त्सुनामी म्हणजे काय आणि ती इतकी घातक का असते? जाणून घ्या माहिती

SCROLL FOR NEXT