Anant Ambani Give Snake In Shah Rukh Khan Hand Instagram
मनोरंजन बातम्या

Anant Ambani And Shah Rukh Viral Video: अनंत अंबानींनी दिला किंग खानच्या हातात साप; धक्कादायक Video पाहून नेटकरी संतापले, म्हणाले...

Viral Video: अंबानींची कन्या ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांच्या वाढदिवसाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी किंग खानसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे.

Chetan Bodke

Anant Ambani Give Snake In Shah Rukh Khan Hand

नुकतंच रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या जुळ्या नातवांचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यात आला. अंबानींची कन्या ईशा अंबानी आणि जावई आनंद पीरामल यांना कृष्णा आणि आदिया अशी दोन मुलं आहेत. यांच्या वाढदिवसाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या बर्थडे पार्टीला शाहरुख खानने सुद्धा हजेरी लावली होती. सध्या या पार्टीतला व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Viral Video)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडीओमध्ये, शाहरुख खान आणि अनंत अंबानी बोलताना दिसत आहे. अनंत अंबानी बोलत असताना तो अचानक शाहरुखच्या हातात जिवंत साप देताना दिसत आहे. हातात अचानक साप देताना पाहून किंग खान थोडासा घाबरतो, पण त्या सापाला तो अगदी रिलॅक्समध्ये हाताळताना दिसत आहे.

इतकंच नाही तर अनंत अंबानींनी त्याच्या गळ्यावरही साप ठेवला. किंग खानच्या हातात सापपाहून राधिका मर्चंट जोरजोरात किंचाळताना दिसते. हा व्हायरल व्हिडीओ शाहरुखच्या एका फॅनपेजने शेअर केला आहे. (Social Media)

या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांकडून हजारो लाईक्स मिळाले असून मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळालेले आहेत. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केल्य आहेत. अनेक युजर्स किंग खानला त्याला खंबीर म्हणत आहेत, तर कोणी त्याचे कौतुक करत आहेत. एका चाहत्याने ‘व्वा किती लकी साप आहे’ असे म्हटले आहे. तर एका व्यक्तीने लिहिले की, ‘हे चुकीचे आहे, शाहरुखसोबत तुम्ही असे वर्तन करु शकत नाही.’ तर आणखी एकाने हा व्हिडीओ डिलीट करा, या व्हिडीओमध्ये किंग खानला ‘जोकर’ सारखी वागणून दिली, अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Bollywood Actor)

अंबानींच्या सोहळ्याला सामान्यपणे सेलिब्रिटींची मांदियाळी काही पहिल्यांदाच दिसत नाही. यावेळी अनेक कार्यक्रमांमध्ये बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. ईशाच्या जुळ्या मुलांच्या वाढदिवसाला, शाहरुख खानसह अभिनेत्री कटरिना कैफ, कियारा आडवणाी, करिश्मा कपूर, अनन्या पांडे, अभिनेता आदित्य रॉय कपूरही उपस्थित होते. यावेळी दिग्दर्शक करण जोहर सुद्धा आपल्या जुळ्या मुलांसोबत पार्टीला स्पॉट झाला होता. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT