Anant- Radhika Wedding Vachan Video  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anant- Radhika Wedding : सप्तपदी घेतल्यानंतर राधिका- अनंतने मंडपातच दिले एकमेकांना खास वचन, चाहत्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

Anant- Radhika Wedding Vachan Video : अत्यंत शाही आणि "न भूतो न भविष्यति" अशा पद्धतीने शुक्रवारी (१२ जुलै) अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा पार पाडला. लग्नामध्ये सप्तपदी घेतल्यानंतर राधिका आणि अनंत यांनी एकमेकांना वचन दिले आहे.

Chetan Bodke

अत्यंत शाही आणि "न भूतो न भविष्यति" अशा पद्धतीने शुक्रवारी (१२ जुलै) अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा पार पाडला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. साखरपुडा, दोन प्री- वेडिंग, संगीत, मेहंदी आणि हळद अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांतून त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली. अशातच सध्या सोशल मीडियावर लग्नातील काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सप्तपदी घेतल्यानंतर राधिका आणि अनंत यांनी एकमेकांना वचन दिलेय. वचन घेतानाचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हिंदू विवाह प्रथेनुसार लग्नगाठ बांधली आहे. सप्तपदी घेत अग्नीला साक्षी ठेऊन त्यांनी एकमेकांना वचन दिले आहेत. वचन घेतानाचे काही फोटो- व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वचन घेतानाचा व्हिडिओ 'व्होम्पला' नावाच्या इन्स्टा चॅनलवरून व्हिडिओ व्हायरल झाला आहे. "लव्ह, धर्म, परिवार, देश आणि जग" असं कॅप्शन देत त्यांनी व्हिडिओ शेअर केलेला आहे.

वचन घेताना राधिका म्हणाली, "घर म्हणजे फक्त एक राहण्याचं ठिकाण म्हणून नाही तर तिथे प्रेम आणि भावनाही असेल. त्या आपल्या घरात प्रेम आणि भावनाही असेल."

तर वचन घेताना अनंत म्हणाला, "राधिका, मी श्री कृष्णाचा आशीर्वाद घेऊन वचन घेतो की, आपण दोघंही एकत्र आपल्या स्वप्नातलं घर बांधूया. आपलं घर म्हणजे चार भिंतींची रुम नसेल. आपण जिथे राहू तिथे कायम प्रेमाचा वर्षाव होईल. आपले घर सदैव प्रेमाने भरलेलं असेल." असं वचन दोघांनीही एकमेकांना दिला आहे. सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून त्यांचे कौतुक केले जात आहे.

अनंत- राधिकाचा हा तीन दिवसांचा लग्नसोहळा असून आज शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशी रिसेप्शन इव्हेंट असेल. लग्नासाठी आणि शुभ आशीर्वाद या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. यावेळी राज्यासह देशातील अनेक महत्वाचे राजकीय मंडळी या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी लग्नाला अभिनेते अमिताभ बच्चन, सलमान खान आणि माधुरी दीक्षितसह बॉलिवूडसह हॉलिवूड सेलिब्रिटींनी कार्यक्रमाला हजेरी लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

SCROLL FOR NEXT