Smita Patil Death Anniversary Saam TV
मनोरंजन बातम्या

Smita Patil Death Anniversary: दोन मुलांचे वडील असूनही केले लग्न; वाचा राज आणि स्मिता यांच्या प्रेमाची रंजक कहाणी

विवाहित असून राज यांनी स्मिताला जीवनसाथीचे वचन दिले आणि ते पाळले देखील.

साम टिव्ही ब्युरो

Smita Patil Death Anniversary: आपल्या दमदार अभिनयाने सिनेसृष्टीला चारचांद लावणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील यांची आज (१३ डिसेंबर) पुण्यतिथी आहे. ३६ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी स्मिता यांची प्राण ज्योत मालवली. मुलगा प्रतीक बब्बरला जन्म दिल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांत त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्या काळी स्मिता आणि राज बब्बर यांच्या प्रेमाची जोरदार चर्चा रंगली होती. विवाहित असून राज यांनी स्मिताला जीवनसाथीचे वचन दिले आणि ते पाळले देखील. आज या बातमीतून त्यांच्या प्रेम काहाणीविषयी काही रंजक गोष्टी जाणून घेऊ. (latets Marathi News)

पहिल्याच भेटीत कडाक्याचं भांडण

स्मिता आणि राज 'भीगी पलकें' या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान पहिल्यांदा भेटले होते. दोघेही या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत होते. अशात पहिल्याच भेटीचा अनुभव राज यांनी अनेक माध्यमांना मुलाखती देताना सांगितला आहे. यात ते म्हणाले की, "जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तोव्हा काही कारणावरून आम्ही दोघे खूप जोरजोरात हसत होतो. त्यानंतर अचानक काहीतरी झाले आणि आमच्यात वाद झाले. स्मिताला यामुळे खूप राग आला होता. मात्र तिचा राग पाहून मला ती अवडू लागली." हा किस्सा राज बब्बर यांनी अनेक वेळा सांगितला आहे.

स्मिता आणि राज यांच्या प्रेमाच्या चर्चेला उधाण आलं होतं. अशात राज बब्बर यांचे आधीच एक लग्न झाले होते. त्यामुळे ते आणि स्मिता लिव्ह-इनमध्ये राहत होते. मात्र याचीही भनक सर्वांना लागली. त्यामुळे दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र राज आधीच विवाहीत असल्याने स्मिताबरोबर असलेल्या नात्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. अखेर काही दिवसांनी राज पहिली पत्नी नादिर यांच्यापासून वेगळे झाले आणि स्मिता यांच्याबरोबर राहू लागले.

स्मितायांच्या कुटुंबीयांनी केला विरोध

राज बब्बर आणि स्मिता पाटील या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. दोघांना एकत्र राहून सुखी संसार करायचा होता. मात्र सुखी आयुष्याच्या या वाटेवर खुप काटे होते. राज यांचे आधीच एक लग्न झाले होते. शिवाय त्यांना दोन मुलं देखील होती. आपल्या मुलीने आधीच विवाहीत (Marriage ) असलेल्या आणि दोन मुलांचा बाप असलेल्या व्यक्तीबरोबर लग्न करूनये असे स्मिता यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे होते. घरातून विरोध असल्याने त्यांच्या विरोधात जाऊन स्मिता यांनी राज बब्बर यांच्याशी विवाह केला.

नशिबानेच केला घात

सर्वांच्या विरोधात जाऊन राज आणि स्मिता या दोन्ही दिग्गज कलाकारांनी लग्न केले. मात्र त्यांचा सुखी संसार काही दिवसांतच मोडकळून पडला. लग्नानंतर स्मिता लगेचच प्रेग्नंट (Pregnant) राहिल्या होत्या. २८ नोव्हेंबर १९८६ रोजी त्यांनी मुलाला म्हणजेच प्रतीक बब्बरला जन्म दिला. त्यानंतर त्यांना अनेक आजार जडले. या आजाराने खुप कमी वयात त्यांची प्राण ज्योत मावळली. १३ डिसेंबर १९८६ रोजी वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSRP नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख जवळ येतेय, ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसं करावं? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

26th July Rain : पालघरसह पुण्याला रेड अलर्ट, पाऊस धुमाकूळ घालणार, दोन जिल्ह्यात शाळांना सुट्टी

Google मधील नोकरी सोडली, सलग तीनदा UPSC परीक्षेत अपयश; चौथ्या प्रयत्नात थेट पहिली रँक, IAS अनुदीप दुरीशेट्टी यांची Success Story

Saturday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न सत्यात उतरेल

SCROLL FOR NEXT