Amy Jackson Ed Westwick Wedding  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Amy Jacksonने अभिनेत्यासोबत थाटला संसार, लग्नसोहळ्यात केलं Liplock, लग्नाआधीच आहे ५ वर्षांचा मुलगा!

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सन (Amy Jackson) तिच्या लग्नामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती. आता अ‍ॅमीने अभिनेता एडवर्ड वेस्टविकशी लग्नगाठ बांधली आहे. हा विवाह सोहळा इटलीमध्ये पार पडला. अ‍ॅमीने आपल्या लग्नाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अ‍ॅमी जॅक्सन आणि एडवर्ड वेस्टविक (Ed Westwick) यांनी लग्न करून आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे. फोटोंमध्ये दोघेही खूप खुश दिसत आहेत. दोघांनीही इटलीमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले आहे. एडवर्ड हा ब्रिटिश अभिनेता आणि संगीतकार आहे. अ‍ॅमी जॅक्सन पांढऱ्या गाऊनमध्ये दिसली, तर एडवर्ड काळ्या पँटसह पांढरा ब्लेझर घातला होता.

अ‍ॅमी जॅक्सनने तिच्या चाहत्यांना ही गोड बातमी सोशल मीडियावर फोटो शेअर करून दिली आहे. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले, 'प्रवास नुकताच सुरू झाला आहे. पहिल्या छायाचित्रात अ‍ॅमी कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे. तर दुसऱ्या चित्रात अ‍ॅमी आणि एडवर्ड दोघेही पोज देताना दिसत आहेत. दोघांच्याही डोळ्यात खूप प्रेम पाहायला मिळत आहे. हे सुंदर फोटो एडवर्डने देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बॅचलर पार्टी

अ‍ॅमी जॅक्सन आणि एडवर्ड वेस्टविक यांनी नुकतीच बॅचलर पार्टीही केली होती. जिथे दोघे एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले. आता दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत. अ‍ॅमी आणि एडवर्ड हे दोघेही २०२२ पासून एकत्र असल्याचे म्हटलं जातं. अ‍ॅमी आणि एडवर्डने जानेवारीमध्ये साखरपुडा केला.

अ‍ॅमी जॅक्सन 5 वर्षांच्या मुलाची आई

अ‍ॅमी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली आहे. तिने बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारसोबत 'सिंग इज ब्लिंग' या चित्रपटातही काम केले आहे. अ‍ॅमीही पाच वर्षांच्या मुलाची आई आहे. वास्तविक, अभिनेत्री याआधी बिझनेसमन जॉर्ज पानायियोटोसह रिलेशनशिपमध्ये होती. दोघांचा साखरपुडा झाला होता. मात्र काही कारणास्थव साखरपुडा तुटला. पण अ‍ॅमीने 2019 मध्ये जॉर्जच्या मुलाला जन्म दिला. मुलाचं नाव अँड्रियास जॅक असे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT