Amruta Subhash On Lust Stories 2 Intimate Scenes Instagram
मनोरंजन बातम्या

Amruta Subhash On Lust Stories 2 Intimate Scenes: 'माझ्या नवऱ्यानेच मला त्या सीन्ससाठी...' ‘लस्ट स्टोरी २’ मधले इंटिमेट सीन्स कसे शूट झाले?, अमृता सुभाषने केला खुलासा

Lust Stories 2 News: ‘लस्ट स्टोरी २’ या वेबसीरीजमध्ये अमृता सुभाषने अनेक इंटिमेट सीन्स दिले आहेत. या सीन्सविषयी खुद्द अभिनेत्रीनेच भाष्य केले आहे.

Chetan Bodke

Amruta Subhash On Lust Stories 2 Intimate Scenes

मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषने ‘लस्ट स्टोरी २’ प्रमुख भूमिका साकारली होती. या वेबसीरीजमध्ये तिने साकारलेल्या भूमिकेची प्रेक्षकांमध्ये, जोरदार चर्चा झाली. ‘लस्ट स्टोरी २’ या वेबसीरीजमध्ये अमृता सुभाषने अनेक इंटिमेट सीन्स दिले आहेत. या सीन्सविषयी खुद्द अभिनेत्रीनेच भाष्य केले आहे. नुकतंच पार पडलेल्या नेटफ्लिक्सच्या अ‍ॅक्टर्स राऊंडटेबलमध्ये अमृता सहभागी झाली होती. दरम्यान, तिने ‘लस्ट स्टोरी २’ची शूटिंग कशी झाली, याबद्दलचा खुलासा केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमृता यावेळी म्हणाली, “ को- स्टार आणि माझा चांगला मित्र श्रीकांत यादवसोबत इंटिमेट सीनच्या शुटिंग वेळी कंफर्टेबल होण्यासाठी कोकोकडे काही वेळ मागितला होता. फक्त मीच नाही तर श्रीकांत सुद्धा इंटिमेट सीन्ससाठी घाबरत होता. आम्ही दोघेही एकमेकांना खूप चांगले मित्र म्हणून गेल्या काही दिवसांपासून ओळखतो.” (Bollywood)

“जेव्हा मी चित्रपटाची कथा वाचली, त्यावेळी कथेमध्ये खूप इंटिमेट सीन्स होते. त्या इंटिमेट सीन्ससाठी मी खूप घाबरत होते. त्यामुळे मी कोकोला बोलले की, श्रीकांत माझा खूप चांगला मित्र आहे. पण तरीही मला त्याच्यासोबत इंटिमेट सीन्स देण्यापूर्वी एक दिवसांचा वेळ हवा आहे. माझा नवरा श्रीकांतचा मित्र आहे. ‘तुम्ही तो सीन व्यवस्थित कराल’ असा म्हणत मला आणि श्रीकांतला माझ्या पतीने प्रोत्साहन दिले.” असा अभिनेत्रीने मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. (OTT)

या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिकेत अमृता सुभाष, अंगद बेदी, काजोल देवगण, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर, नीना गुप्ता, तमन्ना भाटिया, तिलोत्तमा शोम आणि विजय वर्मा आहेत. ‘लस्ट स्टोरी २’ मध्ये चार वेगवेगळे दिग्दर्शकांच्या कथा आहेत. त्यात अमित रविंद्रनाथ शर्मा, कोंकना सेन शर्मा, आर. बाल्की आणि सुजॉय घोष यांचा समावेश आहे. २९ जून २०२३ ला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘लस्ट स्टोरीज २’ ही वेबसीरीज झाली आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे हॉस्पिटलमध्ये; सरेंडरसाठी ४ दिवसांचा वेळ मागितला, पण...

'ED ने राहुल गांधींची बदनामी केली', मुंबईत काँग्रेस आक्रमक, थेट कार्यालयावर मोर्चा

Kitchen Hacks : घरात पंख्यावर खूपच धुळ बसली? मग 'या' सिंपल ट्रिक्सने करा स्वच्छ

White Sesame Seeds Benefits: थंडीत रोज सकाळी एक चमचा सफेद तीळ खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Live News Update: निवडणूक आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर एक्साईज विभागाची धडक कारवाई, ७० लाखांचा बेकायदेशीर दारू साठा जप्त

SCROLL FOR NEXT