Animal Film Scene Copy: काय सांगता... ‘ॲनिमल’मधले ‘हे’ सीन्स चोरलेले, नेटकऱ्यांनी दिला पुरावा...

Animal Scene Copy From South Korean Film: दक्षिण कोरियातील एका चित्रपटाचा सीन कॉपी केल्यामुळे दिग्दर्शकांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केलं आहे.
Animal Film Scene Copy
Animal Film Scene CopyInstagram

Ranbir Kapoor Animal Pre-Teaser Release: रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा काल सोशल मीडियावर प्री-टीझर प्रदर्शित झाला होता, टीझर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर रणबीरच्या लूकची तुफान चर्चा सुरू आहे, सोबतच आता चित्रपटातील काही सीन्स देखील चर्चेत आले आहे.

दक्षिण कोरियाच्या ‘ओल्डबॉय’ चित्रपटातील रणबीरच्या फाईट सीनची कॉपी केल्याबद्दल अनेकांनी दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केलं आहे. हा चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि आजही त्याचे बरेच चाहते आहेत.

Animal Film Scene Copy
Gadar 2 Teaser Out: तारा सिंग इज बॅक... 'गदर 2'चा दमदार टीजर प्रदर्शित

रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओल स्टारर ‘ॲनिमल’ चा प्री-टीझर पाहून चाहत्यांच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही, अशा धमाकेदार टीझर प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. अधिकृत टीझरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले असतानाच, काही नेटकऱ्यांनी दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना ट्रोल केले आहे. दक्षिण कोरियाच्या ‘ओल्डबॉय’ चित्रपटातील रणबीरच्या फाईट सीनची कॉपी केल्याबद्दल अनेकांनी दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केलं आहे. हा चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि आजही त्याचे बरेच चाहते आहेत.

जरी नेटकऱ्यांनी निर्मात्यांना ट्रोल केले असले तरी, अनेकांना ‘ॲनिमल’चा टीझर आवडला आहे. रणबीरचा हा रावडी लूक पाहून प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.

प्री-टीजरची सुरुवात स्कलचे मास्क घातलेल्या काही लोकांपासून होते. त्यांच्या हातात कुऱ्हाडी आहेत. त्यानंतर भिंतीवर लटकलेली कुऱ्हाड दिसते. नंतर सुटाबुटातील काही गायक पंजाबी गाणे गाऊ लागतात.गाणे सुरू झाल्यानंतर रणबेररची एन्ट्री होते. भिंतीवरील कुऱ्हाड घेऊन रणबीर फुल ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे. तर रणबीरचा लूक देखील लक्ष वेधून घेण्यासारखे आहे. रणबीरच्या चेहऱ्यावर जखमा तर आहेतच परतून तो लुंगीत दिसत आहे. आणि लुंगी घालून तो मारामारी करताना दिसत आहे. समशेरानंतर आता ॲनिमलमध्ये रणबीरचा हा अवतार पाहायला मिळत आहे. (Bollywood Film)

Animal Film Scene Copy
Krushna Abhishek On Kapil Sharma: ‘माझा मामा खरंच नंबर वन...’ कृष्णा अभिषेकने मामा गोविंदाचं केलं तोंडभरून कौतुक..

चॉकलेट बॉय म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या रणबीरने टीझरमध्ये रावडी लूक केला असून तो लूक सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. दरम्यान, सनी देओलचा आगामी चित्रपट 'गदर २' आणि अक्षय कुमारचा पुढचा 'OMG 2' सोबतच रणबीरचा देखील ‘ॲनिमल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. बहुचर्चित ठरलेल्या या चित्रपटांची प्रदर्शनाची ११ ऑगस्ट असून कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करेल, ही गोष्ट येती वेळच सांगेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com