मनोरंजन बातम्या

Amruta Khanvilkar: 'माझ्या हृदयाचे दोन तुकडे...'; सोनाली आणि सनायाच्या 'मायलेक' चित्रपटासाठी अमृताची भावनिक पोस्ट

Amruta Khanvilkar post For Maylek Movie: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली खरे नेहमी चर्चेत असते. सोनाली खरेचा 'मायलेक' हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटात सोनालीची लेक सनायाने डेब्यू केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली खरे नेहमी चर्चेत असते. सोनाली खरेचा 'मायलेक' हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटात सोनालीची लेक सनायाने डेब्यू केला आहे. चित्रपटाच्या प्रीमियर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रीमीयर शोला अमृता खानविलकरने हजेरी लावली होती.

सोनाली खरे आणि अमृता या दोघीही खूप घट्ट मैत्रिणी आहेत. तर अमृता सनायाला स्वतः च्या मुलीसारखे वागवते. या दोघींचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 'मायलेक' या चित्रपटासाठी अमृता खानविलकरने खास पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृताने सोशल मीडियावर सनायासोबतचा आणि सोनालीसोबतचा फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर तिने कॅप्शनमध्ये लिहलंय की, 'मायलेक चित्रपट पाहणं हा माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. माझ्या हृदयाच्या दोन तुकड्यांची एक चढ-उतार आणि इमोशन्सने भरलेला प्रवास पाहणं होतं. या चित्रपटातून एक गोष्ट शिकलो ती म्हणजे कितीही काहीही होऊ दे, तुम्ही कुठेही असो, पण तुमची माणसं आणि तुमची आई नेहमी तुमच्यासोबत असते. सनायाचा चित्रपटातील कामाने मला खरच रडवलं. सनया मी आणि तुझी आजी चित्रपटाच्या शेवटच्या सीनला रडत होतो. आयुष्यात कितीही दुःख आले तरीही पुढे चालत जा. प्रार्थना करत राहा. हेच तुला आयुष्यात हवे आहे. मला तुझ्यावर खूप जास्त अभिमान आहे', असं म्हणत चित्रपट पाहण्यास अमृताने सांगितले आहे.

अमृता खानविलकर आणि सोनाली खरे या दोघी खूप घट्ट मैत्रिणी आहेत. दोघींची मैत्री सर्वांनाच खूप आवडते. त्यात आला सोनालीची लेक सनायाने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे. त्यामुळे अमृता खूप जास्त आनंदी आहे. मायलेक चित्रपटात सोनाली खरे, उमेश कामत आणि सनाया मुख्य भूमिकेत दिसत आहेत. चित्रपट १९ एप्रिल म्हणजेच आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मोठा राजकीय घडामोड! भाजपला शिंदे गट जोरदार धक्का देणार?

Central Government: ऐन सणाच्यावेळी केंद्र सरकारनं दिली 'गुड न्यूज', पगार अन् पेन्शनबाबत घेतला मोठा निर्णय

Lalbaugcha Raja 2025 First Look : लालबागच्या राजाची पहिली झलक; भक्तांचा जल्लोष, वातावरण भारावून गेले|VIDEO

Janhvi Kapoor: 'परी म्हणू की सुंदरी...'; फ्लोरल ड्रेसमधील जान्हवीचे ग्लॅमरस फोटो पाहिलेत का?

Maharashtra Live News Update: कुंभमेळ्याच्या आखाड्यात शिवसेना शिंदे गटाचीही उडी

SCROLL FOR NEXT