Amruta Khanvilkar Received Dadasaheb Phalke Award Instagram @amrutakhanvilkar
मनोरंजन बातम्या

Amruta Khanvilkar Emotional Post: तुम्ही हा पुरस्कार खूप खास बनवला... अमृताच्या गैरहजेरीत आई-बाबांनी स्वीकारला सन्मान, अभिनेत्रीची भावुक पोस्ट

Amruta Khanvilkar Honored With Best Actor Award: अभिनेत्री अमृता खानविलकरला सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार मिळाला आहे.

Pooja Dange

Amruta Khanvilkar Received Dadasaheb Phalke Award: दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार सोहळा काल म्हणजे २० मे रोजी पार पडला. या सोहळ्याला अनेक कलाकार उपस्थित होते. परंतु अभिनेत्री अमृता खानविलकरला मात्र या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहता आलं नाही.

अभिनेत्री अमृता खानविलकरला सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार मिळाला आहे. चंद्रमुखी या चित्रपटासाठी अभिनेत्रीला हा सन्मान मिळाला आहे. इतका मोठा सन्मान मिळत असताना अभिनेत्रीला यावेळी उपस्थित राहता आले नाही. अभिनेत्रीने पोस्ट करत याविषयी तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Latest Entertainment News)

अमृताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, काहींनाच आनंद साजरा करण्याची संधी खूप कमी वेळा मिळते… आणि हे मी नक्कीच सेलिब्रेट करणार आहे. कारण माझ्या लाडक्या पालकांनी पहिल्यांदाच माझ्या वतीने पुरस्कार स्वीकारला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३ मध्ये चंद्रमुखीसाठी मला सर्वोकृष्ट पुरस्कार दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! हा पुरस्कार घेण्यासाठी थँक्यू मम्मा आणि थँक्यू पप्पा… तुम्ही हा पुरस्कार खूप खास बनवला आहे.'

अमृता पुरस्कार सोहळ्याला उपस्थित नसल्याने तिच्या आई-वडिलांनी तिच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला आहे. त्यामुळे तिच्यासाठी हा पुरस्कार आणखी खास झाला आहे. तिने तिच्या आई-वडिलांचा या पुरस्कारासोबतच फोटो पोस्ट करून तिचा आनंद व्यक्त केला आहे.

अमृताचा या चित्रपटातील सहकलाकार आदिनाथ कोठारेला देखील सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

Dadasaheb Phalke Film Foundation Awards 2023 मुंबईतील मुकेश पटेल सभागृहात २० मे रोजी पार पडला. 'दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन' पुरस्कार सोहळ्यामध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन अवॉर्ड्स हा मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT