Amitabh Bachchan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan: बिग बींना अभिनेता नव्हे तर 'या' क्षेत्रात करायचे होते करिअर; अमिताभ यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा तो प्रसंग कोणता?

amitabh bachchan birthday : ११ ऑक्टोबर १९४२ साली बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते जन्माला आले. त्यांनी आपली कारकीर्द सिनेमा क्षेत्रात सुरु केली. मात्र त्यांना अभिनेता होण्याआधी इंजिनियर व्हायचे होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूडचे महानायक 'अभिताब बच्चन' यांचा आज ८२ वा वाढदिवस आहे. बॉलिवूड गाजवणारे हे अभिनेते आहेत. त्यांचे प्रत्येक प्रत्येक भुमिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसल्या आहेत. अजुनही त्यांच्या अभिनयाला तोड देणारा अभिनेता फिल्म इंडस्ट्रीत आला नाही. त्यातच 'अभिताब बच्चन' यांना अभिनेता बनण्याची इच्छा नव्हती तर एक इंजिनियर बनण्याची इच्छा होती. अशा चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये होत आहेत. त्यांना अजुनही 'बॉलिवूड' या शब्दाची चिड आहे.

बॉलिवूडचे स्टार 'अभिताब बच्चन' यांनी २०० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९६९ मध्ये 'ख्वाजा अहमद अब्बास' यांनी दिग्दर्शित केलेला 'सात हिंदुस्तानी' नावाचा बॉलीवूड चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातूनच अमिताभ बच्चन यांना प्रसिद्धी मिळाली. त्याचसोबत या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. पुढे त्यांना अनेक चित्रपट मिळत गेले आणि ते बॉलिवुडचे महानायक ठरले. अशा प्रकारची बॉलिवूडमध्ये नाव कमवायला सुरुवात होती.

बॉलिवूडचे स्टार सलमान खान, शाहरुख खान, अमिर खान यांच्यासारखे स्टार अभिनेतेही अमिताभ बच्चन यांना प्रचंड मान देतात. इतके सगळे असून सुद्धा अमिताभ यांना 'बॉलिवूड' हा शब्द आवडत नाही. या प्रश्नांबद्दल त्यांना बऱ्याच वेळेस विचारले गेले आहे. त्यावर ते म्हणाले , 'मला बॉलिवूड ऐवजी 'सिनेमा' हा शब्द वापरणे योग्य वाटते.' असे उत्तर त्यांनी दिले आहे. अमिताभ हे आज बॉलीवूडचे मोठे अभिनेते आहेत. मात्र त्यांच्या तरुण वयात त्यांना अभिनय नाही तर दुसरे क्षेत्र करायचे आहे. त्यांना इंजिनियर होऊन हवाई दलात भरती व्हायचे होते. आता ते सिनेमा क्षेत्रात येवून प्रचंड खुश आहेत.

अभिताब बच्चन म्हणतात, 'बॉलीवूड अनेक बाबतीत पुढे आहे. हॉलीवूडच्याही पुढे बॉलीवूड आहे, असे त्यांना वाटते. त्यामुळे आपल्या सिनेमाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्याला जगातील इतर कोणत्याही भागातून शब्द घेण्याची गरज नाही, असे त्यांना वाटते. त्याचसोबत ते म्हणाले , ' चित्रपट सृष्टीचा मी एक भाग आहे. त्याचा मला प्रचंड अभिमान आहे.' सध्या ते बीग बी कार्यक्रम होस्ट करत आहेत.

Written By : Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT