Good Bye Saam Tv
मनोरंजन बातम्या

Good Bye : अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना लवकरच म्हणणार 'गुडबाय'... नक्की काय आहे प्रकरण?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून 'गुडबाय'(Good Bye) या त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. दाक्षिणात्य चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री 'रश्मिका मंदाना' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदान्ना या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपटाच्या पोस्टर सोबतच निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे.

बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी 'गुडबाय' चित्रपटाचा पोस्टर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये कुर्ता, पायजम्यासोबत निळ्या रंगाचा कोटमध्ये अमिताभ बच्चन दिसत आहेत. छान हसत बिग बी पतंग उडवताना या पोस्टरमध्ये दिसत आहेत. बिग बींच्या अगदी मागे, रश्मिका मंदान्ना हसत-हसत हातात चरखी धरून बिग बींना पाठिंबा देताना दिसत आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्टर शेअर करत, 'कुटुंब हे सर्वात महत्वाचे आहे. कुणी जवळ नसलं तरी त्यांची आठवण कायम सोबत असते. # गुडबाय ७ ऑक्टोबर २०२२ रोजी तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे!'असे कॅप्शन लिहिले आहे.

अमिताभच्या या कॅप्शनचे चाहते कौतुक करत आहेत. या कॅप्शनवरून चित्रपटात कौटुंबिक मूल्ये पाहायला मिळतील असे दिसते. २०२३ हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी अधिक चांगले जाईल, अशी आशा व्यक्त करत चाहते अमिताभ बच्चन यांची स्तुती करत आहेत. त्याचबरोबर काही तरी चांगलं पाहायला मिळणार असल्याची अशा चाहते व्यक्त करत आहेत.

विकास बहल दिग्दर्शित 'गुडबाय' या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबत नीना गुप्ता, एली अवराम, सुनिल ग्रोवर सुद्धा चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. बालाजी मोशन पिक्चर्स निर्मित 'गुडबाय' हा चित्रपट ७ ऑक्टोबर २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT