Belly Fat Yoga: रोजच्या अपचन आणि वाढत्या पोटामुळे वैताग आलाय? मग आजपासूनच करा हे पाच योगासन

Shruti Vilas Kadam

पवनमुक्तासन

या आसनामुळे पोटातील गॅस बाहेर पडण्यास मदत होते. रोज सकाळी हे आसन केल्यास अपचन, फुगलेलं पोट आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

Belly Fat Yoga | Saaam Tv

वज्रासन

जेवणानंतर ५–१० मिनिटं वज्रासनात बसल्यास पचनक्रिया सुधारते. अपचनाची तक्रार असणाऱ्यांसाठी हे आसन खूपच फायदेशीर आहे.

Vajrasana | yandex

भुजंगासन

भुजंगासनामुळे पोटाचे स्नायू ताणले जातात आणि पचनसंस्था सक्रिय होते. यामुळे वाढलेलं पोट कमी होण्यास मदत होते.

Bhujangasana | Yandex

धनुरासन

धनुरासन केल्याने पोटातील चरबी कमी होण्यास मदत होते. हे आसन पचन सुधारून बद्धकोष्ठता दूर करते.

Dhanurasana | Yandex

कपालभाती प्राणायाम

कपालभाती रोज केल्यास पोटावरील चरबी कमी होते आणि पचनसंस्था मजबूत होते. अपचन, आम्लपित्तावर हा प्राणायाम उपयुक्त ठरतो.

Pranayama Benefits | Yandex

मालासन

मालासनामुळे आतड्यांची हालचाल सुधारते. बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनासाठी हे आसन फायदेशीर आहे.

Malasana Pose | Yandex

अर्धमत्स्येंद्रासन

या आसनामुळे पचनसंस्थेला मसाज मिळतो. पोटातील चरबी कमी करण्यासोबतच अपचनावरही हे आसन उपयोगी ठरते.

Ardhamatsyendrasana | Saam Tv

Walking Benefits: सकाळी की संध्याकाळी? वजन कमी करण्यासाठी कोणत्या वेळी चालणे जास्त फायदेशीर ठरते?

walking vs gym
येथे क्लिक करा