Navya Naveli Nanda SAAM TV
मनोरंजन बातम्या

Navya Naveli Nanda : अमेरिकेत शिकलेली नव्या नंदा आता IIM अहमदाबादमध्ये धडे गिरवणार, कारण काय ?

Amitabh Bachchan Grand Daughter : अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिने आयआयएम अहमदाबादमध्ये अ‍ॅडमिशन घेतल आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम हँडलवरून ही खुशखबर दिली आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या नातीने करिअरमध्ये यश संपादन केले आहे. तिने आपल्या सोशल मिडियावर फोटो शेअर करून ही बातमी दिली आहे. तिने आयआयएमसोबत (IIM) फोटो शेअर करून आपण अ‍ॅडमिशन घेतल्याची खुशखबर दिली आहे. सोबतच तिने इंस्टाग्राम या पोस्टला ‘स्वप्न सत्यात उतरले’ असे कॅप्शन दिले आहे. तिने आपल्या सहकाऱ्यांसोबत आणि तसेच संस्थेसोबत फोटो टाकले आहेत. सेलिब्रिटींची मुलं शिक्षणासाठी परदेशात जात असताना, नव्या नवेली अचानक देशातील प्रतिष्ठित व्यवस्थापन संस्थेत सहभागी होऊन प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.

कोणता कोर्स?

नव्या नवेलीने याआधी अमेरिकेच्या फोर्डहॅम विद्यापीठातून डिजिटल टेक्नॉलॉजी आणि यूएक्स डिझाइनमध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे. आता मास्टर्स करण्यासाठी आयआयएम अहमदाबादची निवड केली. नव्या नवेली नंदाने (Navya Naveli Nanda ) ब्लेंडेड पोस्ट ग्रेजुएट प्रोग्राम (BPGP) या कोर्ससाठी आयआयएमला अ‍ॅडमिशन घेतल आहे. ब्लेंडेड पोस्ट ग्रेजुएट प्रोग्राम प्रामुख्याने वर्किंग प्रोफेशनल्साठी असतो. यामुळे त्यांची कौशल्ये वाढतात. यामधून मुलांना व्यावसायिक कौशल्ये शिकवली जातात. यामुळे मॅनेजमेंट गुण देखील सुधारतात.

ब्लेंडेड पोस्ट ग्रेजुएट प्रोग्राम

ब्लेंडेड पोस्ट ग्रेजुएट प्रोग्राम तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पुद्धतीने करू शकता. हा दोन वर्षांचा कोर्स आहे. या कोर्सचे संपूर्ण नाव बीपीजीपी एमबीए आहे. या कोर्समध्ये अ‍ॅडमिशन घेण्यासाठी किमान तीन वर्षांच्या कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच मान्यताप्राप्त संस्थेतून बॅचलर पदवी असावी. प्रवेशासाठी उमेदवाराचे वय किमान २४ वर्षे असणे आवश्यक आहे. या कोर्सची फी 20 लाख रुपये आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उमेदवारांना ऑनलाइन आयआयएमए चाचणी उत्तीर्ण करावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: काँग्रेस वर्किंग कमिटीची राज्यातील पराभवावर बैठक होणार

Raju Shetty : घोषणेप्रमाणे सर्व महिलांना लाभ मिळावा; लाडकी बहीण योजनेच्या नव्या निर्णयावरून राजू शेट्टी यांचा निशाणा

Manoj Jarange : फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी मी कुणाला भीत नाही; मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम

Bhusawal News : विजेचा झटका लागून वायरमन खांबावरून कोसळला; दुरुस्तीचे काम करताना घडली दुर्घटना

Free Visa for Indian: भारतीयांना 'या' देशात मिळणार व्हिसा फ्रि एन्ट्री

SCROLL FOR NEXT