Amitabh Bachchan on Elon Musk Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan Viral Tweet : 'तू चीज बडी है Musk Musk..', अमिताभ बच्चन यांना ट्विटरवर 'ब्लू टिक' परत मिळालं

Viral News : तू चीज बडी है Musk Musk..', अमिताभ बच्चन यांना ट्विटरवर 'ब्लू टिक' परत मिळालं

Satish Kengar

Amitabh Bachchan Viral Tweet : बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचं 'ब्लू टिक' ट्विटरने रिस्टोअर केलं आहे. यानंतर त्यांनी मजेशीर पद्धतीने ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांचे आभार मानले आहेत.

याआधी ट्विटवरने त्यांचं ब्लू टिक काढलं होतं. पेड सर्व्हिस सुरु झाल्याने त्यांच्यासह सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि इतर अनेक सेलिब्रिटींचं ब्लू टिक काढण्यात आलं होतं.

ब्लू टिक रिस्टोअर केल्यानंतर बिग बींनी 1994 च्या 'मोहरा' चित्रपटातील 'तू चीज बडी है मस्त मस्त' गाण्याचे बोल बदलून बिग ब्रदर मस्कचे आभार मानले आहेत. (Latest Marathi News)

अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत म्हटलं की, "अरे मस्क भाई! आम्ही तुमचे खूप आभारी आहोत! माझ्या नावासमोर ब्लू लोटस (ब्लू टिक) जोडले गेले आहे! आता तुम्हाला काय सांगू भाऊ? मला एखाद गाणं गाऊ असं वाटतंय, ऐकायला आवडेल का? बरं ऐका "तू चीज बडी है मस्क मस्क ... तू चिज बडी है मस्क".''

ट्विटरने यापूर्वी पेड सबस्क्रिप्शन सेवा लागू करण्याची घोषणा केली होती, जी मायक्रोब्लॉगिंग साइटवर ब्लू व्हेरिफिकेशन बॅजसाठी 8 डॉलर्स आकारते. ज्यांनी वेळेवर पेमेंट केले नाही किंवा सेवा खरेदी केली नाही, त्यांच्या हँडलवरील निळ्या रंगाचे टिक चिन्ह काढून टाकण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT