Amitabh Bachchan Gifted Daughter Shweta Nanda Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan And Shweta Nanda News: अमिताभ बच्चन यांनी जुहूमधील 'प्रतिक्षा' बंगला दिला लेकीला गिफ्ट, किती आहे बंगल्याची किंमत?

Amitabh Bachchan Gifted Daughter Shweta Nanda: अमिताभ आणि पत्नी जया बच्चन यांनी आपल्या लेकीला हे सर्वाधिक महागडं गिफ्ट दिल्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

Chetan Bodke

Amitabh Bachchan And Jaya Bachchan Daughter Shweta Nanda Gifted House Prateeksha

मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या मालमत्तेबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. बिग बी यांचे मुंबईतल्या जुहूमधील ‘प्रतिक्षा’ बंगल्यावर त्यांची मालकी नसणार आहे. मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या राय बच्चन यांना सोडून बिग बी आणि जया बच्चन यांनी या बंगल्याची मालकी त्यांची लेक श्वेता नंदा बच्चन हिला दिली आहे. अमिताभ आणि पत्नी जया बच्चन यांनी आपल्या लेकीला हे सर्वाधिक महागडं गिफ्ट दिल्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

बंगल्यामध्ये अमिताभ बच्चन, पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चनसह त्याची पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या सुद्धा ‘प्रतिक्षा’ याच बंगल्यामध्ये राहतात. बच्चन कुटुंबीयांची ओळख असलेला हा बंगला आता अमिताभ यांनी त्यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिला भेट म्हणून दिला आहे. याबाबत त्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार बच्चन कुटुंबींयांनी यासाठी तब्बल ५०.६५ लाख रुपये इतके मुद्रांक शुल्क भरले आहे. बंगल्याची किंमत ५०.६३ कोटी एवढी असून ९,५८५ स्क्वेअर फूट परिसरामध्ये विस्तारलेला आहे.

बिग बी अमिताभ यांचे ‘प्रतिक्षा’ सह ‘जलसा’ आणि ‘जनक’ हे सुद्धा बंगले आहेत. श्वेता बच्चन नंदा एक रायटर असून एक्स मॉडेल आणि बिझनेसवुमन सुद्धा आहे. श्वेता बच्चन यांची ‘पॅराडाईज टॉवर्स’ ही कादंबरी सर्वाधिक विकली गेलेली कादंबरी आहे. बच्चन कुटुंबीय १९७६ पासून ‘प्रतिक्षा’मध्ये राहत आहेत. बच्चन कुटुंबीयांनी शहरातील अनेक नामांकित सोसायट्यांमध्ये, आलिशान अपार्टमेंटमध्ये आणि कार्यालयांमध्ये गुंतवणूक केली आहे.

मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचे तर, ‘गणपत’ चित्रपटातून त्यांनी चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. सोबतच बिग बी ‘सेक्शन 84’ आणि ‘कल्की 2898 एडी’ मधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. तर सध्या बिग बी ‘कौन बनेगा करोडपती’चे होस्टिंग करीत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते या शोचे होस्टिंग करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

SCROLL FOR NEXT