Amitabh Bachchan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan: बिग-बींनी अयोध्येत पुन्हा खरेदी केली जमीन; राम मंदिरापासून काही अंतरावर बांधणार 'ही' खास वास्तू

Amitabh Bachchan Property: अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा भगवान श्री रामांच्या अयोध्येत जमिनीचा करार केला आहे. अयोध्येत आधीच जमीन खरेदी केलेल्या बिग बींनी आता राम मंदिरापासून १० किलोमीटर अंतरावर नवीन जमीन खरेदी केली आहे.

Shruti Vilas Kadam

Amitabh Bachchan: 'बॉलिवूडचे महानायक', 'अँग्री यंगमॅन' आणि 'बिग बी' अशा नावांनी ओळखले जाणारे, भारतीय चित्रपटसृष्टीचे दिग्गज अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहेत. चित्रपट आणि टीव्ही शो व्यतिरिक्त, त्यांच्याकडे उत्पन्नाचे इतर अनेक स्रोत आहेत. त्यांनी अनेक मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली आहे आणि आता बिग बींनी पुन्हा एकदा भगवान श्री रामांच्या शहरात म्हणजेच अयोध्येत जमीन खरेदी केली आहे.

२०२४ मध्येच त्यांनी अयोध्येत ४.५४ कोटी रुपयांची जमीन खरेदी केली होती आणि आता पुन्हा एकदा या ज्येष्ठ अभिनेत्याने येथे मोठी खरेदी केली आहे. अमिताभ बच्चन आणि बिग बी यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांच्या नावावर असलेल्या ट्रस्टच्या वतीने राजेश ऋषिकेश यादव यांनी हा करार केल्याचे सांगण्यात येत आहे. ही जमीन तिहुरा मांझा परिसरातील भगवान राम मंदिरापासून १० किमी अंतरावर आहे, जी ५४,४५४ चौरस फूट क्षेत्रात पसरलेली आहे.

अमिताभ बच्चन यांच्या वडिलांच्या नावाने स्मारक बांधले जाईल.

या जमिनीसाठी ८६ लाख रुपये देण्यात आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ यांनी ही जमीन त्यांच्या पत्नी किंवा मुलांसाठी नाही तर त्यांचे दिवंगत वडील आणि प्रसिद्ध कवी हरिवंश राय बच्चन यांच्यासाठी खरेदी केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बिग बी या जमिनीवर हरिवंश राय बच्चन यांचे स्मारक बांधणार आहेत. पण याबद्दल अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. या जमिनीचा वापर सामाजिक किंवा धार्मिक कार्यासाठी देखील केला जाऊ शकतो अशी माहितीही समोर येत आहे.

हरिवंश राय बच्चन मेमोरियल ट्रस्टची स्थापना २०१३ मध्ये झाली.

अमिताभ बच्चन यांनी २०१३ मध्ये त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हरिवंश राय बच्चन मेमोरियल ट्रस्टची स्थापना केली. तेव्हा त्यांनी सांगितले होते की ही ट्रस्ट धार्मिक कार्यांसाठी निधी गोळा करण्याचे काम करेल. बिग बींचे वडील एक प्रसिद्ध कवी होते. १८ जानेवारी २००३ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

SCROLL FOR NEXT