Ram Charan Interview For RRR
Ram Charan Interview For RRR  Twitter
मनोरंजन बातम्या

Ram Charan Interview: अमेरिकाही राम चरणच्या बाळासाठी आतुर; भर कार्यक्रमात अभिनेत्याने डॉक्टरांकडे मागितली मदत

Saam Tv

RRR Song Natu-Natu In Oskar Race: आरआरआर चित्रपट आणि चित्रपटातील कलाकार सध्या चर्चेत आहेत. चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्याला ऑस्करचे नामांकन मिळाले आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अभिनेता राम चरण अमेरिकेला गेला आहे. दरम्यान तिथे राम चरण प्रसिद्ध शो गुड मॉर्निंग अमेरिकामध्ये सहभागी झाला होता.

गुड मॉर्निंग अमेरिका शोमध्ये, राम चरणला आधी आरआरआर या चित्रपटाविषयी प्रश्न विचारण्यात आले होता. त्यावर राम चरण म्हणाला, 'हा चित्रपट मैत्री वर आधारित आहे, बंधुत्व दाखवतो आणि या दोन पात्रांमधील नाते दाखवतो.' पुढे, राम चरण यांनी एसएस राजामौली यांच्या लेखनाचे कौतुक केले आणि त्यांना भारताचे स्टीव्हन स्पीलबर्ग म्हटले. तसेच ते लवकरच ग्लोबल चित्रपटाचे लेखन किंवा दिग्दर्शन करतील असेही राम चरण म्हणाला.

त्यानंतर शोच्या होस्टने राम चरणला वडील होणार असल्याने त्याचे अभिनंदन केले. यावर राम चरण म्हणाला की, जेव्हा आम्ही बाळाचा विचार करत होतो, तेव्हा मी माझ्या पत्नीसोबत होतो, तिला वेळ देऊ शकत होतो. पण आता मी फक्त पॅकिंग आणि अनपॅक करत आहे. आम्ही असा विचार केला नव्हता.

राम चरण होस्टला म्हणाला की, तो तिचा नंबर त्याच्या पत्नीला देईल जेणेकरून ती उपासनाला (राम चारी पत्नी) मार्गदर्शन करू शकेल. यावर होस्टने राम चरणला सांगितले, मी नेहमीच तिच्यासोबत राहीन आणि तुमच्यासोबत संपूर्ण जग प्रवास करेन. तसेच तुमच्या पहिल्या मुलाचा जन्म आणल्याचा मला खूप आनंद होईल.' यावर सर्वजण हसताना आणि विनोद करताना दिसत आहेत.

राम चरण त्या होस्टला असे यासाठी म्हणाला असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर ती होस्ट एक स्त्रीरोगतज्ञ आहे. टाईनुळे राम चरण तिच्याकडे पत्नी उपासना मार्गदर्शन करण्यासाठी सांगत होता.

राम चरणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो दिग्दर्शक शंकर यांच्या आगामी चित्रपट 'आरसी 15'चे शूटिंग करत आहे. या चित्रपटात तो कियारा अडवाणीसोबत दिसणार आहे. आता काही आठवड्यांचा ब्रेक घेऊन तो ऑस्कर सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अमेरिकेला गेला आहे. तर अभिनेता विमानतळावर अनवाणी दिसला होता. अभिनेत्याने अयप्पा दीक्षा घेतली होती. त्यामुळे तो काळ्या कपड्यात आणि चपलेशिवाय फिरत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

Nandurbar Crime: पुष्पा स्टाईलने सागवान लाकडाची तस्करी; जमिनीत पुरली ११ लाख रुपयांची लाकडं

SCROLL FOR NEXT