Satarcha Salman Trailer Out
Satarcha Salman Trailer OutSaam TV

Satarcha Salman Trailer: हिरोचं काम मागतोय 'सातारचा सलमान'; हेमंत ढोमेच्या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

सातारच्या बच्चननंतर आता 'सातारच्या सलमान'ची चर्चा.

Marathi Movie Satarcha Salman Trailer Out: मराठी सिनेसृष्टीत अनेक अप्रतिम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. असाच एक चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपट पाहताना तुम्हाला लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या 'हमाल दे धमाल' चित्रपटाची आठवण नक्की येईल.

आपणही मोठ्या पडद्यावर झळकावे, हिरो बनावे, असे स्वप्न आपल्यापैकी अनेकजण बघतात. काहींचे स्वप्न सत्यात उतरते तर काहींचे स्वप्न स्वप्नच राहते. एका खेड्यातील सामान्य तरुणाने हिरो बनण्याचे स्वप्न पाहिले आहे. 'स्वप्नं बघितली तरंच पूर्ण होतात!' अशी भावना असणाऱ्या तरुणाची हिरो बनण्याची जिद्द, त्यासाठीची सुरु असलेली त्याची धडपड आपल्याला येत्या ३ मार्च रोजी पाहता येणार आहे.

Satarcha Salman Trailer Out
Akshay Kumar Breaks Record: अक्षय कुमार रचला नवीन रेकॉर्ड; तीन मिनिटात काढले सर्वाधिक सेल्फी

प्रकाश सिंघी, टेक्सास स्टुडिओज निर्मित, रिलायन्स एन्टरटेन्मेंट प्रदर्शित ‘सातारचा सलमान' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटात सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका असून महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, अनिकेत विश्वासराव, नेहा महाजन, कमलेश सावंत यांचीही झलक पाहता येणार आहे. तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट धमाल मनोरंजक असणार याचा अंदाज ट्रेलरवरूनच येत आहे.

ट्रेलरमध्ये साताऱ्यात राहणारा एक सामान्य मुलगा हिरो बनण्याचे स्वप्न बघतोय. स्वप्न पूर्ण करण्यासाठीची त्याची मेहनत, त्याचा सामान्य मुलगा ते हिरो बनण्यापर्यंतचा खडतर प्रवास, या प्रवासात त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी त्याला दिलेली साथ चित्रपटामध्ये दिसत आहे. मात्र त्याच्या आयुष्यात आलेले हे चढउतार त्याला कोणत्या वळणावर नेणार आणि त्याला खरंच हिरो बनवणार का, याचे उत्तर 'सातारचा सलमान' पाहिल्यावरच आपल्याला मिळणार आहे.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, '' प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात मोठं होण्याचं स्वप्न बघत असतो आणि या प्रवासात प्रत्येकाच्याच वाटेवर अनेक अडचणी येतात. कधीकधी अशी वेळही येते की, आता सगळं संपलं, असं वाटतं. मात्र आपण वाईटातूनही काही चांगलं बघितलं पाहिजे आणि आयुष्यात पुढे गेलं पाहिजे.

आयुष्यात आशावादी आणि सकारात्मक राहणे खूप गरजेचं आहे. आपण आपलं काम करत राहावं, त्यातूनच काहीतरी चांगलं निष्पन्न होतं, ही ऊर्जा देणारा हा चित्रपट आहे. हा एक धमाल, निखळ मनोरंजन करणारा चित्रपट आहे, जो सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आपल्यातीलच एक वाटेल.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com