Alpha Box Office Collection  saam tv
मनोरंजन बातम्या

Alpha Box Office Collection : 'अल्फा'नं पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी, आलिया-शर्वरीच्या ॲक्शन अन् ग्लॅमरची जादू फेल? वाचा कलेक्शन

Alpha Box Office Collection Day 1 : आलिया भट्टचा 'अल्फा' चित्रपट रिलीज झाला आहे. 'अल्फा'ने ओपनिंग डे ला किती कोटी कमावले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'अल्फा' चित्रपट ३ जुलैला प्रदर्शित

आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ 'अल्फा'मध्ये मुख्य भूमिकेत

'अल्फा' ॲक्शन, थ्रिलर चित्रपट आहे.

बहुप्रतीक्षित 'अल्फा' चित्रपट अखेर काल (३ जुलै २०२६) ला रिलीज झाला आहे. 'अल्फा' आलिया भट्टचा ॲक्शन, थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात आलिया भट्टसोबत बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ देखील झळकली आहे. चित्रपट रिलीज झाल्यावर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे रिह्यू शेअर केले. YRF च्या 'स्पाय युनिव्हर्स'मधील हा सातवा चित्रपट दोन महिलांभोवती फिरतो.

'अल्फा' बॉक्स ऑफिस कलेक्शन

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'अल्फा' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी ओपनिंग डे ला (शुक्रवारी) ७,५३४ शोमधून ९.०० कोटी रुपयांची नेट कमाई केली. यामुळे भारतातील एकूण ग्रॉस कमाई १०.८० कोटी रुपये झाली आहे.परदेशात या चित्रपटाने ५.०० कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली असून, त्यामुळे त्याची जगभरातील एकूण ग्रॉस कमाई १५.८० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

'अल्फा' चित्रपटात आलिया भट्ट आणि शर्वरी वाघसोबत बॉबी देओल आणि अनिल कपूर देखील महत्त्वाचा भूमिकेत झळकले आहेत. बॉबी देओल चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत आहेत, तर अनिल कपूर 'अल्फा' मुलींचे सहाय्यक म्हणून दिसतात. तसेच चित्रपटात हृतिक रोशनची 'कॅमिओ' देखील पाहायला मिळत आहे. प्रेक्षक आलिया भट्ट आणि शर्वरी वाघच्या ॲक्शन मोडचे कौतुक करताना दिसत आहेत.

YRF स्पाय युनिव्हर्समधील मागील चित्रपटांच्या तुलनेत 'अल्फा'ला खूपच कमी ओपनिंग मिळाली. या फ्रँचायझीचा आधीचा चित्रपट 'वॉर २'ने (हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर ) पहिल्याच दिवशी ५२ कोटी रुपयांची नेट कमाई केली होती. शाहरुख खानच्या 'पठाण'ने ५७ कोटी रुपयांची बंपर कमाई केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

रामलीला मैदानावर रावणासोबत झुरळही जाळणार; स्वच्छ भारत अभियानाचा दावा की राजकीय निशाणा?

CJPच्या आंदोलनाआधीच दिपके पोलिसांच्या ताब्यात; दिल्लीत पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा

तिकीट तपासणीवरून महिला प्रवासीचा टीसीसोबत वाद; कांदिवली स्टेशनवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT