Allu Arjun SAAM TV
मनोरंजन बातम्या

Allu Arjun : अल्लू अर्जुनचं मराठी ऐकलंत का? व्हिडीओनं सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ

Allu Arjun Marathi Video : 'पुष्पा २' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अल्लू अर्जुनने प्रेक्षकांशी मराठीत संवाद साधला. नेमकं तो काय म्हणाला, जाणून घ्या.

Shreya Maskar

अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या त्याच्या 'पुष्पा २' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. 'पुष्पा २' (Pushpa 2) हा बहुप्रतिक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पुष्पा २'मध्ये अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

'पुष्पा २'च्या प्रमोशनमध्ये सध्या अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना व्यस्त आहेत. 'पुष्पा २'चा ट्रेलर पटना शहरात प्रदर्शित करण्यात आला. नुकताच अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुंबईत 'पुष्पा २'चित्रपटाचे प्रोमोशन करत होते. तेव्हा अल्लू अर्जुनने चाहत्यांशी मराठीत संवाद साधला आणि सर्वांची मन जिंकली. त्याचा मराठी बोलणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अल्लू अर्जुनच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, "सर्वांना नमस्कार! कसं काय मुंबईकर..." असे बोलतो. त्याची ही विचारपूस पाहून सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतो. अनेकजण शिट्ट्या देखील वाजवतात. त्याच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट्सचा पाऊस पडत आहे. अनेक लोक त्यांचे कौतुक करत आहेत.

अल्लू अर्जुनने या आधी देखील 'पुष्पा' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान प्रेक्षकांशी मराठीत संवाद साधला होता. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' चित्रपट 5 डिसेंबर 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अ‍ॅक्शन-ड्रामा पाहायला मिळणार आहे.

'पुष्पा 2' मध्ये अल्लू अर्जुनने पुष्पाची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना श्रीवल्लीची भूमिकेत दिसत आहे. 'पुष्पा द राईज' हा चित्रपट 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता 'पुष्पा २: द रुल' हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dog Attack : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाचा मुलावर हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Abhyang Snan Time: दिवाळी पहाटच्या दिवशी 'अभ्यंगस्नान' कधी करावे? वाचा शुभ मूहूर्त

Maharashtra Live News Update : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाने केलेल्या हल्ल्यात चिमुकला मुलगा गंभीर जखमी

Diwali 2025 : आली दिवाळी! फटाके फोडताना 'ही' घ्या काळजी, नाहीतर...

Priyadarshini Indalkar: चुनरी तेरी कमाल कर गई.... प्रियदर्शनी इंदुलकरचा हटके लूक

SCROLL FOR NEXT