Allu Arjun  saam tv
मनोरंजन बातम्या

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा बोलबाला; 'पुष्पा 2'ची परदेश वारी, प्रेक्षकांची मनं जिंकणार का?

Allu Arjun -Pushpa 2 : साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' आता जपानमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबर 2024 प्रेक्षकांच्या भेटीला आला.

'पुष्पा 2' चित्रपट परदेशात प्रदर्शित होणार आहे.

साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन टोकियोला पोहचला.

साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' ने जगभरात खळबळ उडवून दिली. 'पुष्पा 2' चित्रपट डिसेंबर 2024 मध्ये रिलीज झाला. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाने 1780 कोटी रुपयांची कमाई केली. आता मात्र पुष्पाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

साऊथचा पुष्पा आता जपानमध्ये दिसणार आहे. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार,'पुष्पा 2' जपानमध्ये 16 जानेवारीला रिलीज होणार आहे. 'पुष्पा 2' जगभरात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे. निर्मात्यांनी सांगितले की, जपानी लोकांनी चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित करावा अशी विनंती केली होती. त्यानंतर हा चित्रपट 'पुष्पा: कुनरीन' या शीर्षकाने प्रदर्शित होत आहे. पूर्वी हा चित्रपट फक्त पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता.

'पुष्पा 2' चित्रपट

'पुष्पा 2' हा एक ॲक्शन चित्रपट आहे. 2021मध्ये रिलीज झालेला 'पुष्पा द राइज' या चित्रपटाचा सीक्वल आहे. चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना झळकले आहेत. 'पुष्पा 2' चित्रपट सुकुमार दिग्दर्शित आहे. या चित्रपटातील अल्लू अर्जुनआणि रश्मिका मंदानाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे.अल्लू अर्जुनच्या आगमी चित्रपटांची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

आगामी चित्रपट

अल्लू अर्जुन लवकरच लोकेश कनगराज दिग्दर्शित 'AA23' मध्ये झळकणार आहे. तसेच अल्लू अर्जुन ॲटलीचा आगामी प्रोजेक्ट 'AA22XA6' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण झळकणार असल्याचे बोले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चिपळूणमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का, माजी आमदार रमेश कदम यांचा पक्षाचा राजीनामा

मतदारांना आकर्षित करण्यासाठी वाट्टेल ते... चांदीच्या वाट्या वाटल्या, VIDEO

RailOne अ‍ॅपवरुन रेल्वेचं तिकीट बुक करा अन् ३ टक्के डिस्काउंट मिळवा; आजपासून सुविधा सुरु

Famous Singer Death : लोकप्रिय गायकाचं निधन, 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रचाराच्या तोफा थंडावल्या असतानाच भाजपमधून ७६ बड्या नेत्यांची हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT